*बारामती जुगार अड्डा छापा प्रकरण...कारवाई करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ? पोलिसां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव*
बारामती दि.२७: बारामती येथील तांदुळवाडी येथे बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना अटक केली होती.दरम्यान आता पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विरोध करत.पोलिसांनी कारवाई करताना आरोपींना केलेली अटक हि मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा दावा करत संबंधित पोलिसांविरोधात मुंबई उच्चन्यायालयत जाणार असल्याचे आरोपींचे वकील ॲड.सुशील शिंदे यांनी सांगितले.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि बारामतीतील तांदुळवाडी येथे दि.२३ जून २०२१ रोजी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांच्या पथकाने कारवाई करत प्रदीप झुंबर अहिवळे यांच्या घरात छापा टाकून दहा जणांविरोधात बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मुंबई जुगार अधिनियम ४,५,११ व आपत्ती व्यवस्थापन भा.द.वि १८८ अ नुसार गुन्हा दाखल करून बारामती न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता.आरोपींचे वकील ॲड.सुशिल शिंदे यांनी पोलिसांनी केलेल्या अटके संदर्भात तीव्र आक्षेप नोंदवत मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला.ज्या मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचे खालील न्यायालयांना आदेश दिले आहेत.पुढे आरोपींचे वकील यांनी गुन्ह्यातील बहुतांश आरोपी हे ५५ ते ६० वयोगटातील असल्याने त्यांना मधुमेह,रक्तदाब या सारखे विकार असून त्यांना औषधोपचार चालू असल्याचे सांगत जामीन पात्र असलेल्या गुन्ह्यात कोरोना काळात पोलिसांनी केलेली कडक कारवाई हि आरोपींवर अन्यायकारक असल्याचे सांगत न्यायालयासमोर तोंडी व लेखी युक्तिवाद केला.सदर युक्तिवाद ग्राह्य धरत मा.न्यायालयाने आरोपींच्या वकिलांच्या लेखी युक्तिवादावर व दाखल कागदपत्रांवर म्हणणे देण्यासाठी तपासी अधिकारी यांना आदेश देत.सदर आरोपींची पाच हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.
दरम्यान आरोपींचे वकील ॲड.शिंदे यांना या संबंधी विचारले असता.सदर आरोपींना झालेली अटक हि मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे नियम भंग करून करण्यात अली असल्याचे सांगत.त्या संदर्भात लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment