*संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर*
(अशोक कांबळे यांजकडून)
बारामती (प्रतिनिधी) :- संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार व सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने रविवारी (ता. ४) सकाळी ९ ते ४ यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
सदरचे शिबीर खंडोबानगर येथील सत्संग भवनात होणार आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्माबरोबर आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत, कोविड-१९ परिस्थितीमध्ये मदत कार्य आदी सामाजिक कार्य जोपासत असल्याचे मिशनचा नावलौकिक आहे.
रविवारी होणाऱ्या या शिबिरात निरंकारी अनुयायांबरोबर इतरांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन झांबरे यांनी केले आहे.
सदरचे शिबिर शासनाच्या नियमांचे पुर्णपणे पालन करून मंडळाच्या आदेशान्वये पार पडणार असल्याचेही श्री. झांबरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment