*कृषी पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष पदी नुतन गणेश जाधव यांची निवड*
बारामती - प्रतिनिधी
कृषी पदवीधर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नूतन गणेश जाधव यांची निवड झाली आहे.
कृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषी व संलग्न पदवीधरांनी , पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहेत. शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी संघटना सदैव कार्यरत आहे कृषी पदवीधर संघटना पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नूतन जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक महेशद कडुस पाटील, अध्यक्ष मंगल कडूस पाटील व उत्तर महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष व विदर्भ युवती निरीक्षक गुंजन कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे उद्देश तळागाळापर्यंत पोचवून कृषी पदवीधरांचे व शेतकऱ्यांचा समस्या शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तर वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडण्याचा मानस असल्याचे नुतन गणेश जाधव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment