अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने सुहासनगर रहिवाशांचा 'हंडा नाद' मोर्चा... बारामती:- बारामती नगर परिषदेसमोर आज बारामती येथे सुहास नगर अमराई या अनुसूचित जाती जमातीतील परिसरातील नागरिकांना पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ' हंडा नाद' आंदोलन करण्यात आले, यावेळी स्थानिक रहिवासी यांनी पिण्याच्या पाणी गेली सात वर्षे झाली प्रलंबित असल्याने याची वारंवार स्थानिक नगरसेवकांना व नगराध्यक्ष आणि प्रशासनाला सांगून देखील त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. भारतीय संविधान व नगरपालिका ॲक्ट मध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोक राहत असणाऱ्या वस्त्यांचा विकास करणे व त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवने व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे असताना देखील बारामती शहरामध्ये पाणी ह्या मूलभूत प्रश्नासाठी दलित वस्त्यांन मधील नागरिकांना आंदोलन करावे लागत असेल तर हे खूप मोठे दुर्दैव आहे त्यामुळे तेथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा व त्याचे लाईट बिल नगरपालिकेने भरावे यासाठी आज बारामती नगरपालिकेच्या समोर महिलांनी हंडा नाद आंदोलन केले या आंदोलनाच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपासाठी जर सोडवला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला व आंदोलनास पाठिंबा दिला. त्यावेळी तेथे अनिकेत मोहिते,सिद्धांत सावंत, भास्कर दामोदरे, गौरव अहिवळे, रोहन मागडे व आधी कार्यकर्त्यांनी यांनी देखील आक्रमक भूमिका मांडत पाठिंबा दिला.सुहास नगर रहिवाशी यांना बारामती नगरपरिषदेच्या वतीने पंधरा दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने अखेर हंडा नाद आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे सुहासनगर मधील रहिवाशी संतोष चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
Post Top Ad
Monday, June 28, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने सुहासनगर रहिवाशांचा 'हंडा नाद' मोर्चा...
अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने सुहासनगर रहिवाशांचा 'हंडा नाद' मोर्चा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment