देशभरात दागीने " हॉलमार्कींग कायद्याची" आजपासून अमलबजावणी.
बारामती ( प्रतिनिधी ):- मंगळवार ता १५ जुन रात्री उशीरापर्यंत केंद्रीय उद्योग व ग्राहक व्यापार मंत्री पियुश गोयल यांचे बरोबर " ईंडीयन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन "व ईतर सराफ संघटनाच्या प्रतिनिधीशी झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला असुन पुर्वीच्या कायद्यात काही बदल करुन आजपासून देशभरात ज्वेलरी वरील हॉलमार्कींग कायद्याची अमलबजावणी सुरु करण्यात येत असल्याचे केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले व तसा आदेश दिला, याबाबत ची माहीती "ईंडिया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन "चे महाराष्ट्र राज्य समन्वयक किरण आळंदीकर यानी दिली .केंद्रसरकारने सोने चांदीच्या व्यवसायात अधिक पारदर्शीपणा यावा म्हणून हॉलमार्क कायदा केला आहे.त्याची अमलबजावणी १ जुन पासुन होणार होती, मात्र व्यापारी वर्गानी हॉलमार्क सेंटर सर्वत्र उपलबध नसल्याची अडचण सरकारला दाखवुन दिल्याने व कोव्हीड च्या पार्श्वभूमीवर जुना माल तत्काळ हॉलमार्क करणे अशक्य असल्याचे सकृत दर्शनी दाखवल्यामुळे मंत्रालयाने १ सप्टेंबर पर्यंत जुना स्टॉक हॉलमार्क करण्यास मुदत दिली आहे . तत्पूर्वी कोणताही अधिकारी सोन्याच्या दुकानात सबंधीत तपासासाठी जाणार नाही असे स्पष्ट केले . सध्या देशभरात ९४० हॉलमार्कींग सेंटर असुन वर्षातील ३०० दिवसात जवळपास १४ कोटी दागीने हॉलमार्क होवु शकतात अशी माहीती ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चीम भारताचे प्रमुख विजय लष्करे यानी सांगीतली .
उद्योग व ग्राहक मंत्रालयाने चर्चेत सकारात्मक तोडगा काढल्याने देशभरातील फक्त हॉलमार्क सेंटर असलेल्या २५६ जिल्ह्यात हॉलमार्कींग लागु होणार आहे . ४० (चाळीस लाखाच्या) आतील वार्षीक उलाढाल असलेल्या व्यापारी वर्गाला सक्ती केली नाही तसेच २० ,२३ व २४ कॅरेट च्या हॉलमार्कींग ला मान्यता दिली .१०० वर्षापुर्वीची राष्ट्रीय संस्था असलेल्या ईंडीयन बुलीयन ज्वेलर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र मेहता व सहकारी वर्गानी आपली अडचण पद्धतशीर व सनदशीर मार्गाने मंत्रालयाच्या निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे देशभरातल्या व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे, असे मत "ईब्जा" ( ईंडीयन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन ) चे महाराष्ट्र राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यानी व्यक्त केले .बारामती ला सोने चांदीच्या शुद्धतेची परंपरा आहे त्याचप्रमाणे २३ व २४ कॅरेट चे दागीने ईथे असतात त्यामुळे बारामती च्या व्यापाराला विशेष फायदा होईल असेही मत आळंदीकर यानी व्यक्त केले .
No comments:
Post a Comment