बारामतीचे यशपाल (बंटी दादा) भोसले यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश चिटणीस पदी निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

बारामतीचे यशपाल (बंटी दादा) भोसले यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश चिटणीस पदी निवड

बारामतीचे यशपाल (बंटी दादा) भोसले यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश चिटणीस पदी निवड
बारामती : बारामती नगरीचे सुपुत्र व आंबेडकरी चळवळीतला पँथर ढाण्या वाघ ज्यांनी वेळोवेळी समाजाला न्याय मिळवून दिला असे यशपाल विश्वनाथ भोसले यांना बंटी दादा या नावाने ओळखले जाते यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती प्रदेश चिटणीस पदी निवड सुधाकर भालेराव माजी आमदार व भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती यांनी केली आहे यशपाल यशपाल उर्फ बंटी दादा यांनी वेळोवेळी समाजावर अन्याय होत असताना प्रत्येक वेळेस आंदोलने मोर्चे उपोषणे
न्यायालयीन प्रक्रिया राबवून दलित समाजाला न्याय मिळवून दिला अशी ख्याती संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली आहे. यांना भारतीय जनता पार्टीचे बारामती शहर अध्यक्ष पद असताना
यांनी महिलांना बचत गट फायनान्स च्या त्रासातून
वाचवण्यासाठी भला मोठा मोर्चा काढून महिलांना न्याय मिळवून दिला समाज हितासाठी वेळोवेळी आंदोलने केली.वयाच्या सोळाव्या वर्षी यांनी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले
बारामती शहर बौद्ध संघटना स्थापन करण्यात स्थापन करण्यात यांचा मोलाचा वाटा होता. तसेच प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन
बौद्ध युवक संघटनेची शाखा स्थापन करून तेथील दलित जनतेला होणार्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिकवले व त्यांना न्याय मिळवून दिला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश
करून दिले. मग ते पहिलीपासून असो किंवा डॉक्टर की इंजिनीरिंग पर्यंत असो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले व मागासवर्गीयांची पूर्णपणे माफ व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलने केली स्वतः कधी पक्षाच्या पदाचा व राजकीय पदाचा व नेतृत्वाचा न विचार करता अनेक विद्यार्थी व तरुण नेतृत्व पुढे आणले समजामध्ये अनेक समजाच्या
हक्कासाठी व अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी असंख्य कार्यकर्ते तयार करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले या सर्व कामाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने यांना महत्वपूर्ण कामगिरी
सोपवून व यापुढील काळामध्ये जास्तीत जास्त राज्यभरात अनुसूचित जातीचे संघटन वाढवून व आपला अनुभव संघटनेच्या कामी येईल ही बाब लक्षात घेऊन व अनुसूचित जाती ला न्याय
मिळून देण्यासाठी यशपाल उर्फ बंटी दादा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावर निवड झाल्यामुळे सर्व
अनुसूचित जातीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यापुढे अनुसूचित जातीच्या समस्या निर्माण होणार नाही अशी लोकांना अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment