सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या दबावामुळे SVPM कॉलेज ने केले सर्व विद्यार्थ्यांचे Exam Form Inward - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या दबावामुळे SVPM कॉलेज ने केले सर्व विद्यार्थ्यांचे Exam Form Inward

सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या दबावामुळे SVPM कॉलेज ने केले सर्व विद्यार्थ्यांचे Exam Form Inward

माळेगाव(प्रतिनिधी):- शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (SVPM) महाविद्यालय, माळेगाव हे विद्यार्थ्यांचे Exam Form Inward करत नाही अशी तक्रार घेऊन काही विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेकडे आले होते. त्यावर संघटने कडून तात्काळ कार्यवाही करत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संपर्क केला असता ते उडवाउडविची उत्तरे देत आहेत हे पाहून महाविद्यालयाच्या संस्थेच्या सचिवांना भेटून याबाबत निवेदन देण्यात आले. महाविद्यालयाच्या सचिवांनी लगेच फॉर्म Inward करू असे पेपर ला बातमी न देण्याच्या अटीवर आश्वासन दिले परंतु तो सचिवांनी शब्द पाळला नाही. आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकत Exam फॉर्म आडवत त्यांच्याकडून फी वसुल करणे सुरूच ठेवले. 
     शेवटी सम्यक ने आक्रमक पाऊल उचलत महाविद्यालयाची तक्रार समाज कल्याण विभाग चे आयुक्त यांना निवेदनाच्या स्वरूपात दिली. सहाय्यक आयुक्त संगीता डावकार यांनी तत्काळ कार्यवाही करत बारामतीचे समाजकल्याण विभागाचे अधिकारी भालके वॉर्डन यांना महाविद्यालयात जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले.
     आखेर महाविद्यालयाने चुक मान्य करत जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचे लगेच फॉर्म inward करून घेतले आणि राहिलेले सर्व फॉर्म शक्य तेवढ्या लवकर Inward करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवल्यामुळे विद्यार्थ्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे आनंद व्यक्त करत मनापासुन आभार मानले. 
      मागणी पुर्ण करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, SVPM कॉलेज प्रतिनिधी प्रतिक चव्हाण, विनय दामोदरे, सुरज घाडगे, संघर्षा संखद, कौस्तुभ ओव्हाळ, ओंकार कांबळे, शुभम चव्हाण, राहुल जगताप, हृषिकेश वाघमारे, स्वराज जकाते, अभिजित घाटेशाही, अनिकेत खांडेकर, अक्षय गोटेगावकर आदींने प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment