*'डीड्स फॉर नीड्स' ह्या संस्थेच्या वतीने सावंतवाडीत 1000 फळझाडांचे मोफत वाटप...*
*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दुर्गभ्रमंती सोशल फाऊंडेशन सदस्यांच्या शुभहस्ते झाले प्रत्येक कुटुंबी 10 फळझाडांच्या वाटपाला सुरुवात...*
बारामती: दि.21:-'डीड्स फॉर नीड्स' या संस्थेच्या माध्यमातून मा. सौ. संगिताजी सक्सेना मॅडम आणि मा.सौ. प्रियाजी कपाडिया मॅडम यांनी 1000 फळझाडे सावंतवाडी गावासाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. आज त्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दुर्गभ्रमंती सोशल फाऊंडेशन बारामतीचे अभिजीत घाडगे, अविनाश बांदल, चंदू लोंढे, अक्षय परकाळे आणि राकेश दुर्गाडे हे सदस्य उपस्थित होते. त्यांचे हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबी 10 फळझाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरज सावंत, राहुल सावंत, शुभम सावंत, वैभव सावंत, सुरेंद्र सावंत, तुकाराम गरगडे, दिलीप गरगडे आणि आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावर्षी 1000 फळ झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. 2019 या वर्षापासुन सावंतवाडी गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक कुटुंबी दहा झाडे लावण्याचा मानस केला आहे. या उपक्रमामध्ये मा.सौ. संगिताजी सक्सेना मॅडम आणि मा.सौ. प्रियाजी कपाडिया मॅडम ह्यांनी मोठा सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या 'डीड्स फॉर नीड्स' ह्या संस्थेच्या वतीने दरवर्षी गावाला 1500 हजार फळझाडे देण्यात येतात. या वर्षीदेखील त्यांच्याकडून 1000 फळझाडे गावासाठी मोफत देण्यात आली आहेत. यामधे आंबा, नारळ, पेरू, चिकू आणि लिंबू या फळझाडांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत 'डीड्स फॉर नीड्स' ह्या संस्थेच्या वतीने प्रत्येक कुटुंबी 10 फळझाडे याप्रमाणे गावाला जवळपास 4000 फळझाडांचे वाटप करण्यात आले आहे.
या स्तुत्य उपक्रमास ग्रामस्थांकडुन सुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे...
No comments:
Post a Comment