माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का..ईडीने 4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त..!
मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीने 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 जुलै) समोर आली होती. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही 350 कोटी रुपये
इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ईडीने काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीच्या अधिकार्यांनी या मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं म्हटलं होतं. पण ही किंमत खरेदीची किंमत आहे. या मालमत्तेची आजच्या बाजार भावाची किंमत तब्बल 350 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा चौकशीसाठी
गैरहजर असल्याने अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला असल्याचे समजले.
No comments:
Post a Comment