तहसीलदार यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर पुण्याच्या एसीबी केला गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

तहसीलदार यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर पुण्याच्या एसीबी केला गुन्हा दाखल...

तहसीलदार  यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी मागणी केल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर पुण्याच्या एसीबी केला गुन्हा दाखल...                                                                                    पिंपरी चिंचवड:- येथील तहसीलदार  यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी मागणी केल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पिंपरी चिंचवडसह पुणे  जिल्ह्यात खळबळ माजली आहे. खासगी व्यक्तीचा खडी क्रेशरचा व्यवसाय  3.याप्रकरणी दिलीप दंडवते (रा.दिघी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नं.444/1/1/1 या जमिनीच्या 7/12 मधील क्षेत्रात नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतचा सुनावणी सुरू आहे.
पिंपरी चिंचवड तहसीलदार येथे सुरू आहे.या सुनावणीचा निकाल तहसीलदार यांच्याकडून
मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी दिलीप
दंडवते याने तहसीलदार यांच्यासाठी 50 लाख
लाचेची मागणी केली होती.याबाबत त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  एसीबीकडे (ACB) तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली.त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले.त्यांनुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार यांच्या नावाने पैसे मागितल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अशीच परिस्थिती जर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात असेल तर यांच्या वर विश्वास कसा ठेवायचा असे मत व्यक्त होताना दिसत आहे, याबाबतीत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणे अवघड झाल्याचे दिसत आहे, अश्या लाचखोरीमुळे प्रशासनावरचा विश्वास उडाला असल्याचे अनेकांनी बोलुन दाखविले, अश्या प्रकारच्या कितीतरी अधिकाऱ्याची चौकशी ईडी मार्फत लावली तर नक्कीच किती खोटाळ्यात ,जमिनीच्या निकालात, महसुलात आर्थिक लूट केल्याचे दिसून येईल यासाठी सामाजिक संघटनेने चौकशी लावण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले, तर अशी कुणाची आर्थिक लूट झाली असेल तर एसीबी , ईडी सारख्या एजन्सीकडे तक्रारी करण्यासाठी मागणी करावी असेही नागरिक बोलताना दिसून येत आहे, अश्या अधिकारी यांची व त्यांच्या नातेवाईक यांच्या नावावर केलेली प्रॉपर्टी याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

No comments:

Post a Comment