कोरड्या विहिरीतून निघू लागल्या पाण्याऐवजी 500 आणि 2000 च्या नोटा.... नवी दिल्ली:- उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एका कोरड्या प्राचीन विहिरीतून पाण्यावाचून 500 आणि 2000 च्या नोटा निघू लागल्या. ही बातमी
वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांनी एकच गर्दी करून पैसे लुटण्यास सुरूवात केली.कानपुरच्या पसेमा गावाबाहेर प्राचीन शिवमंदिर आहे, मंदिराच्या शेजारीच प्राचीन विहिर असून ती 50 फुट खोल आहे. विहिर कोरडी आहे.याच विहिरीजवळ मुले खेळत असताना त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता त्यांना धक्काच बसला यानंतर सर्व मुले जमा झाली विहिरीत मोठ्या प्रमाणात पाचशे आणि दोन हजारच्या नोटा पडल्या होत्या.यानंतर मुलांनी तेथील काही चिकट फळे धाग्याला बांधून विहिरीत सोडली आणि काही नोटा बाहेर काढल्या.नोटा काढण्यासाठी वापरल्या वेगवेगळ्या पद्धती ,यानंतर आजूबाजूचे गावकरी सुद्धा जमा झाले, विहिरीजवळ मोठी गर्दी जमा झाली.प्रत्येकजण नोटा काढण्यासाठी वेगवेगळी युक्ती वापरू लागला.विहिरीत एक मोबाइल फोन सुद्धा पडला होता.पसेमा सरपंचांनी सांगितले की, याबाबतची माहिती सायंकाळी उशीरा पोलिसांना देण्यात आली.असे म्हटले जात आहे की, एखाद्या चोराने चोरीनंतर नको असलेल्या वस्तू या विहिरीत टाकल्या असतील आणि त्या टाकताना मोबाइल आणि पैशांचे बंडल विहिरीत पडले असेल.या संपूर्ण घटनेवर अद्याप प्रशासनाकडून
कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजले.
No comments:
Post a Comment