रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे आणि सुरेखा कुसाळकर यांना पुरस्कार प्रदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे आणि सुरेखा कुसाळकर यांना पुरस्कार प्रदान

*रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे आणि सुरेखा कुसाळकर यांना पुरस्कार प्रदान*

कोंढवा पुणे- ज्यावेळी लोक घरातून बाहेर पडण्यासाठी भीत होते, त्याकाळी आपल्या ओळखीच्याही नसलेल्या रुग्णांची मदत करायला जे मोजके कार्यकर्ते बाहेर पडून अहोरात्र मदत करीत होते, त्यातील प्रमुख नावे म्हणून रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर उपाध्यक्ष यशस्वीनी नवघणे आणि संघटक सुरेखाताई कुसाळकर यांचा परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. 
        शाल, साडीचोळी आणि पुष्पगुच्छ देऊन दोघी रणरागिणीचा सत्कार करण्यात आला. या समारंभाचे आयोजन रूग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष अपर्णा साठे यांनी केले. 
        कोंढवा आरएचपी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, विद्या चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफभाई तारकश, हाफिज शेख, रुग्णहक्क परिषदेच्या सोशल मीडिया प्रमुख वनिता पंडित उपस्थित होते.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सचिव संजय जोशी यांनी तर सूत्रसंचालन गणेश भोईटे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे असिफ पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment