गांज्याच्या व्यसनात अडकतेय तरूणाई,!
केव्हा होणार गांजा विक्रेत्यावर कारवाई ?... बारामती : विकासाच मॉडेल म्हणून बारामती कडे पाहिलं जातं अश्या बारामती मध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या असून बाहेर गावाहून याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आवर्जून येतात कारण बारामतीचा नावलौकीक आहे, म्हणुन लौकिक असलेल्या बारामतीत कायदाही तेवढाच कडक आहे, पण बऱ्याच ठिकाणी चोरून गांजा विक्री होतेय सहजपणे मिळणार्या गांज्याच्या विळख्याततरुणाई सापडली आहे. विक्रेत्यांची संख्या भरमसाठ नाही म्हटले तरी पोलिस यंत्रणेचे ब-यापैकी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, शहरासह ग्रामीण भागातही गांज्या विक्री करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. अगदी गल्लीबोळातही गांजा उपलब्ध होतोय, हे वास्तवच याची भयानक परिस्थिती
दर्शवणारी आहे. याचा परिणाम समाज आणि कुटुूंब व्यवस्थेवर होतोय याकडे कोणाचेही लक्ष नाही.सध्या गांज्याच्या नशेसाठी किंवा नशेमध्ये तरुणांकडून घडणारे किरकोळ गुन्हे भविष्यात घातक ठरू शकतात.पोलिसांच्या कारवाया हा यावरील आता उपाय राहिलेला नाही तर घराघरातील पालक आणि गल्लीबोळातील नेते, कार्यकर्त्यांना या समस्येकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा सध्या शेजा-याच्या घरातील हे दुखणं कधी स्वतःच्या घरात
येईल हे कळणार देखील नाही. तरुणाई वाचवण्यासह गुन्हेगारी रोखण्यासाठी गांज्याची तस्करी रोखावीच लागेल. त्यासाठी सामुहीक प्रयत्न गरजेचे बनले आहेत. "गाजाचा अवैध विक्री करणार्या अनक विक्रेत्यावर
गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी भरीव कारवाया झाल्या आहेत. अनेक गांजा विक्रेत्यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे; परंतु पोलिसांच्या या कारवायांना सामान्य जनतेची साथ मिळाल्यास अधिक प्रभाव दिसेल. शिवाय हा अवैध व्यवसाय करणार्यांवर दबाव राहील.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे अशा अवैध गांजा विक्री करण्याच्यांची नावे पोलिसांना कळवली तरी चालतील. गांजा विक्रेत्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.अनेक विक्रेते बनलेत शहरात तालुक्यात अनेक गांजा विक्रेते म्हणजे एक प्रस्थ बनले आहे. त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय संरक्षण आहे,गरजू
आणि नेहमीच्या व्यसनाधीन तरुणांना त्यांच्याकडून गांजा घरपोच होतो. हा गांजा पोहोचवणारी मुलेही साधी सायकल किंवा मोटार सायकल घेऊन जातात, जेणेकरून कारवाई झाली, तर केवळ सायकल किंवा मोटार सायकल जप्त होते.सध्या तरुणाईमध्ये गांजाचे व्यसन वाढते आहे.वर्तणूक बदलणे, झोप न येणे, असबंद्ध बडबड, भास होणे, स्वभाव चिडखोर, संशयास्पद वृत्ती बळावणे, ही गांजाच्या व्यसनाधिन झालेल्यांची लक्षणे असतात.
बहुसंख्य तरुण हे केवळ मित्रांचा दबाव किंवा
कुतूहलापोटी या व्यसनाकडे वळतात. हे प्रमाण वाढते आहे.तरुणांमधील गांजाच्या व्यसनाने सध्या सामाजिक स्वास्थ्य बिघडते आहे. गांजाचे व्यसन हे अन्य व्यसनांच्या तुलनेत स्वस्त आहे. सहजगत्या उपलब्ध होणारा गांजा अल्पशिक्षित तरुणाईलाच नव्हे तर उच्चशिक्षीतानांही संकटाच्या खाईत लोटत आहे. त्यासाठी
गावागावातील गल्लीबोळात गांजा विकणार्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरीकांनी बोलून दाखवली.
No comments:
Post a Comment