बारामती शहर पोलीसाची दबंग कामगिरी चार तासात चोरीच्या गुन्हयाचा उलघडा करून मुद्देमालासह आरोपी ताब्यात
बारामती:- आज दिनांक १४/०७/२०२१ रोजी १०:३० वा.चे सुमारास फिर्यादी सौ. भाग्यश्री विजय जगताप, रा.मलठण ता. फलटण जि.सातारा, हया त्याचे मालकीचे तीन चाकी टेम्पो नंबर एम.एच.११/ए.जी. ६५६८ ही मधुन त्याचे पती, दुसरी बहीण रूपाली असे लहान मुलासह मौजे रूई ता. बारामती येथे बहिण राजश्री भोसले हिला भेटण्यासाठी जात असताना १०:३० वा चे सुमा. गुणवडी चौक बारामती येथे टेम्पो थांबवुन फिर्यादी व त्याची बहिण रूपाली अशा दोघीजनी त्याचे पर्स व साहित्य टेम्पोचे कॅबीनमध्ये ठेवुन मिठाईचे दुकानात गेले
लहान मुले असल्याने फिर्यादीचे पती विजय जगताप हे टेम्पोचे मागील बाजुस मुलांजवळ उभे राहिले. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीची पर्स केबिन मधुन काढुन चोरून नेली. फिर्यादी हया परत आल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला व त्याची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनकडे
मदतीसाठी धाव घेतली व घडली हकीकत सांगुन पर्स मधील १) २५,०००/- रूपये किंमतीचे कानातील कर्णफुले २) १३,०००/- रूपये किमंतीचे सोन्याच्या रिंगा व १००० / - रू रोख रक्कम त्यामध्ये ५०० रूपये दराच्या २ नोटा असा एकुण ३९००० /- रूपये किंमतीचा माल चोरून नेल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार
सहा फौज माळी यांना मिळताच त्यांनी लागलीच सदरची माहिती पो नि नामदेव शिंदे सो. यांचे निर्दषनास आणुन दिली. त्याचे सुचनेप्रमाणे सपोनि प्रकाश वाघमारे, पो. हवा. गोपाळ ओमासे, मपोना राजश्री आटोळे,पो ना नुतन जाधव, पो काँ बंडु कोठे, असे घटनास्थळी रवाना झाले त्यांनी घडनास्थळावरून एक अज्ञात
महिला त्या परिसरात वावर असल्याची माहिती प्राप्त झालेनंतर तिचे वर्णनाप्रमाणे पोलीसांनी शोध चालु करूनवेगवेगळया दिशेने जाणारे रोडचे परिसरात शोध घेवुन,मळद गावचे हद्दीत क-हा नदीचे पात्रातील काटवानात एक महिला आपले अस्त्वि लपवत असल्याचे दिसले तिस मपोना राजश्री आटोळे यांचे मदतीने ताब्यात घेवुन
तिचे कब्जात वरील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे. तिचे नाव अक्काताई राजा काळे, वय ६५ वर्ष, रा.गोखळी फाटा ता. बारामती जि. पुणे असे आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे साो. यांचे मार्गदर्शना खाली सपोनि प्रकाश वाघमारे,ठाणे अंमलदार सहा. फौज. माळी, पो.हवा.गोपाळ ओमासे, मपोना राजश्री आटोळे, पो ना नुतन जाधव,कॉ बंडु कोठे, पो कॉ महेश माने यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment