पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ कमी होणेसाठी बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ कमी होणेसाठी बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन...

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ कमी होणेसाठी बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन...

बारामती:-केंद्र सरकारने जनतेला खोटी आश्वासने व मोकळया भुलथापा मारून गेल्या ७ वर्षापासुन
संपुर्ण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेची पुर्णपणे वाट लावलेली आहे. पेट्रोल, डिझेल, तसेच घरगुती
गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवुन सर्व सामान्य जनतेचे जीवन अर्थिक दृष्टया हतबल केले आहे.या सर्व बाबींमुळे कधी नव्हती ऐवढी महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये वाढलेली आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनता बैचेन झालेली आहे. नवीन रोजगार निर्मिती न करता लाखो तरूण बेरोजगार झाले आहेत.अनेक वेगवेगळया प्रकारची करवाढ लावुन प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढण्याचे महापाप या सरकारने केले आहे. अशा सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणार्या या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करित आहोत.केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढ त्वरीत कमी करावी अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकार दरबारी पोहचवावी यासाठी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते तर या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी(प्रांताधिकारी) दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले

No comments:

Post a Comment