बारामती तालुका पोलिसांनी एमआयडीतील चोरीचा गुन्हा केला चोवीस तासाच्या आत उघड,चोरी झालेला ११ लाख रूपये किमतीचा मुददेमाल केला हस्तगत....
बारामती:- एका आरोपीकडुन स्पेन्टेक्स कंपनीतील सीमेन्स कंपनीचे इलेक्ट्रीक ड्राइव्ह इन्वहर्टर पाच संच गुन्हयातील चारचाकी वाहन असा एकुण ११ लाख किमतीचा मुददेमाल केला हस्तगत ,बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतीत एम.आय.डी.सी स्पेन्टेक्स सीएलसी प्रा.लि या धागा बनविणारे कंपनीतून सीमेन्स कंपनीचे इलेक्ट्रीक ड्राइव्ह ५ इन्व्हर्टर सी. पी. यु किंमत ८,००,०००/रू हे कंपनीचे कम्पांउडची तार तोडून आतमध्ये प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केल्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकाला सदरचा गुन्हा उघड करणेबाबत
मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बारामती तालुका पोलीसांनी गोपनीय माहिती काढून चोवीस तासात संशयीत इसम नामे.१) लालमोहन मौर्य वय.२२वर्षे सद्या रा.कुल मुंबई यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी करून त्याच्याकडून स्पेन्टेक्स सीएलसी प्रा. लि.कंपनीमध्ये सीमेन्स कंपनीचे इलेक्ट्रीक ड्राइव्ह इन्व्हर्टर ५ सी.पी.यु.तसेच चोरी करणेकरीता
वापरलेली स्वीप्ट डिझायर चार चाकी गाडी नं एम.एच ०३ व्हि.सी-५७९३ असा एकुण
चोरी केलेले ११,००,०००/-रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षकमहेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवा.रमेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद
लोखंडे,भुलेश्वर मरळे,होमगार्ड मोरे,कांबळे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment