बारामती तालुक्यातील खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाणार बेमुदत संपावर
बारामती - दि 20, राज्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणा-या
लोकांवर निबंधक Msvc यांचेकडुन विनाकारण नाहक बदनामी व त्रास देत आहेत. संविधानाने भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ च्या कलम ३० (ख) व कलम ५७ (१) बाबतीत दुर्लक्ष करुन व वर्तमानपत्रात चुकीची माहिती प्रसारीत करुन आमची बदनामी करण्यात येत आहे. या साठी आमच्या संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या वतीने वेळोवेळी संबधीत अधिकारी यांना पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल किवा खुलासा केला जात नाही. तरी बारामती शहर व तालुक्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व डॉक्टर्स दिनांक २२.०७.२०२१ पासुन मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद अदोलन करणार आहोत. संप पुकारल्यानंतर होणा-या पशुधनाच्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील. खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे शहर व तालुक्यात जवळपास १५० डॉक्टर्स आहेत. पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ शाखा बारामती अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भरणे ,उपाध्यक्ष डॉ. प्रशांत नालंदे, डॉ.रमजान तांबोळी, सचिव डॉ. विशाल घनवट यांनी प्रसिद्धीस दिले
No comments:
Post a Comment