दादांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवनंदन हॉस्पीटल चा कोविड वॉरिअर प्रमाण पत्र देऊन सन्मान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 29, 2021

दादांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवनंदन हॉस्पीटल चा कोविड वॉरिअर प्रमाण पत्र देऊन सन्मान

*दादांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवनंदन हॉस्पीटल चा कोविड वॉरिअर प्रमाण पत्र देऊन सन्मान*

बारामती दि. २८: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने बारामती तालुका व शहर मधील काही ठरविक कोविड हॉस्पिटल्सची कोविड वॉरिअर म्हणून निवड करण्यात आली होती. यामध्ये बारामती मधील डॉ. गणेश भागवत बोके व डॉ. तुषार गदादे यांचे शिवनंदन हॉस्पिटल ची उत्कृष्टपणे सेवा देणारे कोविड हॉस्पिटल म्हणून निवड करण्यात आली.
त्यानिमित्ताने आज डॉ. गणेश भागवत बोके यांच्या सह त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता गणेश बोके यांनी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून गुलाब पुष्प व प्रमाणपञ देऊन गौरव केला.
या निमित्ताने डॉ. गणेश बोके म्हणाले की, कोरोना सारखा घातक रोग सुमारे एक वर्षपासून थैमान घालत असताना तुमच्या सारख्या कर्मचारी वर्गाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची अखंड सेवा केलीत त्यामुळे हा गौरव पूर्ण सन्मान प्राप्त झाल्याचे सांगत त्यांनी हा पुरस्कार माझा नसून तुम्हा कर्मचारी वर्गाचाच आहे असे संबोधून डॉ. गणेश भागवत बोके, डॉ. स्मिता गणेश बोके, डॉ. तुषार गदादे, डॉ. सुप्रिया तुषार गदादे व डॉ. मोरे यांनी सर्व कर्मचारी वर्ग म्हणजेच सेक्युरिटी,वॉर्डबॉय,रिसेप्शन, नर्सिंग स्टाफ 
, डॉक्टर स्टाफ चे कौतुक करून गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
      तसेच डॉ. तुषार गदादे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते म्हणाले कि, आज संपन्न झालेल्या *आभार आणि कौतुक* सोहळ्यात माझा कंठ दाटून आल्यामुळे मला आपल्या सर्व स्टाफ बद्दलची असणारी आपुलकी आणि वाटणारा अभिमान अश्रूंच्या मागे लपून गेला. या Covid च्या  काळामध्ये तुम्ही सर्वांनी दाखवलेले धैर्य आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे, आणि या तुमच्या धाडसी निर्णयाला प्रामाणिकपणाची साथ मिळाली आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचले. त्यासाठी कितीही पुरस्कार दिले तरी कमीच आहेत.मी वैयक्तिक बऱ्याच हॉस्पिटलला भेट दिली होती परंतु पेशंटच्या जवळ जाऊन त्याला आपुलकीने ट्रीटमेंट देणारा स्टाफ *फक्त  शिवनंदन हॉस्पिटलचाच* आहे याचा मला अभिमान वाटतो.डॉ मोरे यांनी सांगितले की आपल्या हॉस्पिटलचा डेथ रेट सर्वात कमी आहे याचं श्रेय डॉ बोके सरांसोबत तुम्हा सर्वांना जात आहे. तसेच आपला मेडिकल मधील स्टाफ आणि लॅब मधील स्टाफ आणि शिवनंदन कॅन्टीन स्टाफ यांचे योगदान मोलाचे आहेत त्यांनीही अहोरात्र रुग्णांसाठी सेवा चालू ठेवली आहे. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे बोलत त्यांनी कार्यक्रम संपन्न केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता गणेश बोके यांनी केले.

No comments:

Post a Comment