काय सांगता.. या गावातून खुलेआम वाहतूक होतेय वाळू.... महसूल व आर टी ओ विभागाचा याकडे कानाडोळा.! बारामती:-तालुक्यातील निरा व कऱ्हा नदीलगत व ओढयालगत अवैध वाळू उत्खनन चालू असून या गावातील नागरिक तक्रार करतात तरी देखील कारवाई होत नाही कारण वाळू माफियाचे यांना कार्ड चालू असल्याचे बोलले जाते,नदीलगतच्या गावातील रस्त्याची दुरवस्था झाली असून अश्या वाळू माफियांवर कारवाई झाली तर महसूल मिळेल त्यातून गावाचा विकास होईल पण तसे होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त करताना स्थानिक रहिवासी बोलताना दिसत आहे.तलाठी व मंडल अधिकारी यांचे मोबाईल बंद असतात किंवा उचलले तरी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात तहसीलदार यांना सांगितले तर पाहून घेतो एवढेच उत्तर नेहमी ऐकावयास येते त्यामुळे तक्रारी करणे म्हणजे शहाणपण विकत घेणे असे होत असल्याचे सांगितले, आर टी ओ विभागाचे तर वेगळीच तऱ्हा यांना साधे रस्त्यावर प्रमानापेक्षा जास्त वाळू, खडी, रेती, मुरूम वाहतूक करताना ट्रक,ट्रॅक्टर दिसत नसावं की त्यावर जाणून बुजून कारवाई करायची इच्छा नसावी हे त्यांनाच माहीत. पण अश्या ओव्हर लोड वाहतुकीचे परिणाम काही वेळा अपघातात होते हे अनेक घडलेल्या घटनांवरून दिसून आले आहे.पाटस रोड, मोरगाव रोड, गुणवडी रोड, निरा वागज रोड,भिगवण रोड या रस्त्यावर ओव्हरलोड वाळू, मुरूम, खडी, रेतीच्या गाड्या वाहतूक करताना दिसते पण कारवाई होत नाही हे संशयास्पद वाटते त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये अश्या अधिकारी वर्गाच्या बद्दल काय भावना आहेत हे इथे न मांडणे हेच बरे.. *शनिवार,रविवार व सुट्टीच्या दिवशी कऱ्हावागज,अंजनगाव,नेपत वळण, बऱ्हाणपूर, उंडवडी या गावात वाळू उत्खनन जोरात चालू असते, कारण यादिवशी तलाठी,मंडल अधिकारी यांचे मोबाईल बंद तरी असतो नाहीतर तो उचलला जात नाही, उचलला च तर त्या तक्रारीकडे कानाडोळा केला जात असल्याचे ही सांगितले जातंय*
Post Top Ad
Saturday, July 24, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
काय सांगता.. या गावातून खुलेआम वाहतूक होतेय वाळू.... महसूल व आर टी ओ विभागाचा याकडे कानाडोळा.!
काय सांगता.. या गावातून खुलेआम वाहतूक होतेय वाळू.... महसूल व आर टी ओ विभागाचा याकडे कानाडोळा.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment