बारामती मधील कुप्रसिध्द् गुन्हेगार लाला पाथरकर याचेवर पुणे ग्रामीण पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

बारामती मधील कुप्रसिध्द् गुन्हेगार लाला पाथरकर याचेवर पुणे ग्रामीण पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई...

बारामती मधील कुप्रसिध्द् गुन्हेगार लाला  पाथरकर  याचेवर पुणे ग्रामीण पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई...
बारामती:-पुणे जिल्हयात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुण लोकांकडुन आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याकरीता बेरोजगार, अशिक्षीत लोकांच्याकडून आर्थिक प्राप्ती करीता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यातुन वाढत जाणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे भाउ, दादा, भाई यांचा होणारा उगम व त्यांची सर्वसामान्य जनतेत आसणारी दहशत व त्याद्वारे विनासायास मिळणारा पैसा यामुळे हा वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षीला जात आहे. त्याचा फायदा सराईत गुन्हेगार घेत असुन त्याचे मदतीने सराईत गुन्हेगार हे राहत असलेल्या परिसरात स्वत:चे वर्चस्व निर्माण करणेसाठी त्याच्या संघटीत टोळया कार्यरत करतात. तसेच जबरी चोरी,गर्दी मारामारी, खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे सारखे गुन्हे करतात. सदर बेकायदेशिर गुन्हेणारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणे व नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.बारामती शहर पोलीस स्टेशनचे हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार लाला आत्माराम पाथरकर याचेवर सन २००१ पासुन खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारीसह दुखापत,शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, सरकारी कामात अडथळा आणणे अशा शिर्षकाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आतापर्यंत एकुण १८ गुन्हे दाखल आहेत. सन २०१७ मध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन कडुन मु.पो. का.क.५६ प्रमाणे १ वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई
करणेत आलेली होती. सदरची कारवाई चालु असताना देखील त्याने बारामती शहर पोस्टे हद्दित जबरी चोरी,गर्दी मारामारी सारखे गुन्हे केलेले आहेत. सन २०१९ मध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन कडुन मु.पो.का.क.५५ प्रमाणे ३ महीन्याकरीता हद्दपार करणेत आलेले होते. या काळात देखील त्याने बारामती शहर पोस्टे हद्दित खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे सारखे गुन्हे केलेले आहेत. तसेच त्याचे दहशतीमुळे अनेक लोकांनी त्याचे विरोधात पोलीस स्टेशनला घडलेल्या गुन्हयासंदर्भात तक्रारी दिलेल्या  नाहीत.पुणे जिल्हयातील वाढती संघटीत गुन्हेगारी यांचे वर वचक बसविण्यासाठी तसेच त्यावर कडक कारवाई करणेसाठी एम.पी.डी.ए तसेच मोक्का व हद्दपार अशा कायदयाचा आधार घेवुन सराईत तसेच संघटीत गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे कामी मा.श्री.मनोज लोहीया,पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्या आदेशानुसार डॉ.श्री. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व पद्माकर घनवट, वरीष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा यांनी आक्टोबर २०२० पासुन आज पर्यंत एकुण १७ टोळीतील ७४ लोकांना म.पो.बेकायदा विशेष का.क.५५ अन्वये हृद्दपार करणेत आलेले असुन १२ टोळयातील ६५ लोकांकडून चांगले वर्तणुकीचे बंधपत्र घेणेत आलेले आहे.वरील अनुशiाने बारामती मधील कुप्रसिद्ध गुन्हेगार लाला आत्माराम पाथरकर वय वर्षे ३५ रा.इंदापुर रोड,आमराई बारामती जि.पुणे याचेवर एम.पी.डी.ए. अंतर्गत धोकादायक व्यक्ती
म्हणून कारवाई करुन त्याचा प्रस्ताव मा.डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पूणे यांना सादर करणेत आला होता. त्याचे आदेशानुसार लाला आताराम पाथरकर यास ताब्यात घेवुन त्यास कारागूह पुणे येथे स्थानबद्ध करणेत आलेले आहे तसेच भिगवण, राजगड, आळेफाटा व शिरूर या पोलीस स्टेशनचे हददीतील बाळा उर्फ जगदीश पोपट दराडे, आप्पा ज्ञानदेव माने, राहुल अर्पण भोसले तसेच निलेश उर्फ नानु उर्फ नाना
चंद्रकांत कुर्लप याचे संघटीत पणे चालणारे गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे कामी सदर ४ टोळयातील एकूण ३१ लोकांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत.तसेच निलेश बन्सीलाल गायवळ व गजानन पंढरीनाथ मारणे या दोन धोकादायक व्यक्तीवर यापुर्वी मा.डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशान्वये स्थानबध्द्तेची कारवाई करण्यात आलेली आहे.पुणे जिल्हयात गुन्हेगारी टोळयांचा वावर वाढल्याने वेळीच पुणे ग्रामीण पोलीस कार्यरत होवुन त्यांनी लाला आत्माराम पाथरकर याचेवर कडक अशी स्थानबध्दतेची कारवाई केली असुन गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगारावर वचक निर्माण केला आहे. भविष्यात सुध्दा सराईत गुन्हेगार,संघटीत टोळयावर हृद्दपार, मोक्का, स्थानवध्द अंतर्गत कारवाई करणार आहोत.सदरची कारवाई ही मा.श्री.मनोज लोहीया, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर व डॉ.श्री. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच श्री. मिलींद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग व श्री.नारायण शिरगांवकर, उपविभागीय पेालीस अधिकारी, बारामती यांचे आदेशानुसार श्री.मयुर भुजबळ, प्रो. पोलीस उप अधिक्षक, श्री.पद्माकर घनवट, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नामदेव शिंदे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक , बारामती शहर पो.स्टे. प्रकाश वाघमारे,सहा.पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोस्टे, सफौ. शिवाजी निकम,
दिलीप वरकडे, पोहवा गोपाळ ओमासे, पोना अतुल जाधव, अंकुश दळवी, रुपेश साळुंखे, तुषार चव्हाण, अकबर शेख, दशरथ इंगोले, सुहास लाटणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील दत्तात्रय जगताप,सहा.पोलीस उप निरीक्षक तसेच पोहवा. ज्ञानेश्वर क्षिरसागर, हणुमंत पासलकर, चंद्रकांत जाधव, यांनी केलेली आहे.                *श्री.मयुर भुजबळ, प्रोपेशनल पोलीस उप अधिक्षक,यांनी हाथी कारभार घेताच बारामती सारख्या नामवंत गावातील गुन्हेगारांवर खऱ्या अर्थाने दबदबा बसला, मटका, जुगार, हातभट्टी दारूवरची धडक कारवाई ही काही दिवसात अल्पावधीतच कालावधीत केलेली कारवाई कौतुकास्पद आहे हे बारामती  मधील नागरिकांनी पाहिजे असे अधिकारी जर बारामती ला लाभले तर खऱ्या अर्थाने जुगार, मटका, दारू व बोकाळलेली गुन्हेगारी बंद होण्यास वेळ लागणार नाही,अश्या अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे*

No comments:

Post a Comment