आर एच पी हॉस्पिटल सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांच्या तुफान गर्दीत सुरू - माजी आमदार महादेव बाबर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 27, 2021

आर एच पी हॉस्पिटल सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांच्या तुफान गर्दीत सुरू - माजी आमदार महादेव बाबर

आर एच पी हॉस्पिटल सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांच्या तुफान गर्दीत सुरू - माजी आमदार महादेव बाबर

कोंढवा, पुणे - रुग्णांची सेवा आणि त्यांचे हक्क - अधिकारासाठी लढणारी जगातील पहिली संघटना म्हणून रूग्ण हक्क परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी उमेश चव्हाण यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. रुग्णांच्या सेवेचे आदर्श प्रतीक किंवा मॉडेल कसे असावे? म्हणून पाहिलेल्या संकल्पनेला पूर्ण रूप आता प्राप्त झाले असून प्रचंड प्रतिसादात, मोठ्या गर्दीत कोंढवा येथे रुग्ण हक्क परिषदेच्या ''आरएचपी हॉस्पिटलमध्ये'' लोक उपचारासाठी दाखल होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे  माजी आमदार महादेव बाबर म्हणाले. 
        रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते आरएचपी हॉस्पिटलचे उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, नगरसेवक हाजी गफूर पठाण, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेविका हाजी परविन फिरोज, माजी नगरसेवक राजेंद्र बाबर, नारायण लोणकर, आरपीआयचे निलेश आल्हाट यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 
      या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेच्या अपर्णा साठे, चंद्रकांत सरोदे, वर्षाताई काळे, सविता बोरुडे, संध्या निकाळजे, महेश आठरे, यशस्वीनी नवघणे, नम्रता पवार, संजय जोशी, दीपक पवार, गिरीश घाग, डॉ. कीशोर चिपोळे प्रमुख उपस्थित होते. 
         यावेळी सूत्रसंचालन संचालक गणेश भोईटे यांनी केले तर संयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफभाई तारकश यांनी केले. आर एच पी हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असून या हॉस्पिटलची रचना अत्यंत दर्जेदार अशी आहे. आरएचपी हॉस्पिटलचे उद्घाटन २५ जुलै पासून ते ३१ जुलै पर्यंत फक्त दहा रुपयांमध्ये सर्व रोग तपासणी शिबीर आयोजित केले असून त्याला नागरिकांचा हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात सहभाग लाभत आहे. मोठ्या गर्दीत प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment