आंबील ओढ्याच्या कारवाईत माझा संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्पष्ट... पुणे:- आंबिल ओढ्याच्या कारवाईत माझा काहीही संबंध नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्पष्ट, मागील आठवड्यामध्ये दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण घरावर कारवाई करण्यात आले. कारवाईत अनेक घरे
जमीनदोस्त झाली. त्यावेळी स्थनिकांनी आक्रमक झाले होते.न्यायालयाने अतिक्रमण कारवाईला स्थगिती दिली.काही वेळानंतर यावरून
महापालिका सत्ताधारी असणार्या भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी अनेक
गोंधळ निर्माण झाला होता. तर या कारवाईवरून
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित
पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नियमाप्रमाणे आठवडा बैठक घेण्यासाठी पुण्यात आले होते.त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आंबिल ओढ्याच्या मुद्यावरून भाष्य केलं आहे.त्यावेळी अजित पवार म्हणाले, 'आंबिल ओढ्याची खूप चर्चा झाली.माझा काही दुरान्वये संबंध नाही. तो प्रशासनाचा निर्णय होता, असं त्यांनी म्हटलं आहे.
'मी माझ्यावरची जबाबदारी कधीच झटकत नाही, असं म्हणत पवार म्हणाले,'माझी बहिण तिथे गेली तर पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या.
उगाच काय राजकारण करता?, असं देखील
अजित पवार यांनी म्हटलं आहे.पुढे अजित पवार म्हणाले,परवा पुणे महापालिका संदर्भात बैठक घेतली.महापौरांना बोलावलं होतं. पण बातमी उलट्या आल्या. मात्र त्यांच्याशी बोललो तर घरी एक दुर्घटना घडली होती म्हणून त्यांनी सांगितलं होतं.मी कधी ही असं वागत नाही. मी पण पुणेकर आहे. पुणेकरांचा अपमान मी होऊ देणार नाही,असे अजित पवार म्हणाले आहेत.
या दरम्यान, त्यावेळी आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. 'तुमच्यावर झालेल्या कारवाईबाबत ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ' असं खा. सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या होत्या.
परंतु, कुटुंबीयांनी आक्रमक होत खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर थेट अजित पवार यांचं नाव घेत आरोप केला गेला.त्यावेळी अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या,मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी
कडक भूमिका देखील खा.सुळेंनी मांडली होती.
No comments:
Post a Comment