वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई, सात दिवसा साठी सीलबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई, सात दिवसा साठी सीलबंद..

:वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई, सात दिवसा साठी सीलबंद..                                                                                       वडगाव निंबाळकर:- वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत शासन आदेशाच पालन न करता आस्थापना सुरू ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापना वर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली आहे.
गायत्री किराणा स्टोअर्स (वानेवाडी), भोसले
 इंटरप्राईजेस (वानेवाडी), घोडके मटन शोप (करंजेपुल),हॉटेल तोरणा मिसळ (उंडवडी), हॉटेल गवळी चहा (उंडवडी), ही पाच दुकाने सात दिवसासाठी सील करण्यात आली आहेत.सदर कारवाई साठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून पाच प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बारामती यांच्याकडे सादर करण्यात आले होते. तहसीलदार यांच्याकडून सदर आस्थापना बंद करण्याबाबत आदेश झालेने ही पाच दुकाने वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात दिवसासाठी सीलबंद केली आहेत.

No comments:

Post a Comment