सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचारासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचारासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन

सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचारासाठी  प्रांताधिकारी यांना निवेदन                                                                       बारामती:- कोरोना कोविड 19 व इतर रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचारासाठी बारामतीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.प्रांताधिकारी कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.असे आश्वासन दिले.यावेळी नॅशनल दलित मुमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी संबंधित अंगीकृत रुग्णालये व संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक लावण्याची मागणी केली,वंचित बहुजन आघाडी चे पुणे जिल्हामहासचिव मंगलदास निकाळजे यांनी बारामती व इंदापूर तालुक्यातील सद्यस्थिती सांगून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होत आहे हे दाखवून दिले.एन.डी.एम.जे संघटनेचे विधी सल्लागार ऍड अमोल सोनवणे यांनी सर्व कायदेशीर बाबी शासन निर्णय,अधिसूचना व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील बारकावे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास आणले.यावेळी पुणे जिल्हा निरीक्षक धनाजी गायकवाड,इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव धाईंजे,तालुका सचिव शिवाजी बनसोडे, अनिल बगाव,अतुल बनसोड,नवनाथ भागवत,प्रणव भागवत हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment