रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक अति उत्साहात संपन्न
दोंडाईचा-धुळे(दिनेश लोंढे),: - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक दोंडाईचा जिल्हा धुळे येथे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब वाल्मीक दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थिती होती या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अण्णासाहेब वाल्मिक दामोदर यांनी किल्ले लळींग लंडोर बंगला भिमस्मृती यात्रा धुळे येथे ह्या वर्षी 31 जुलै रोजी मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहावे आसे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी मा.रमेशजी मकासरे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर बाबुजी धिवरे,उत्तर महाराष्ट्र सचिव रविभाऊ रुपा गांगुर्डे,धुळे जिल्हाप्रमुख शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हाप्रमुख अरविंदजी कुंवर,युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, मिनाताई बैसाणे, नयनाताई दामोदर, नगरसेविका लक्ष्मीताई मकासरे,वंचितचे प्रदेश सचिव नानासाहेब ठाकरे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष शंकर जाधव, जगन्नाथ ठाकरे, काशीनाथ देवरे, आबासाहेब खंदारे, अंजनाताई चव्हाण, राजुबाबा शिरसाठ, संजयभाऊ बैसाणे,आदित्य निकम,दाऊद शेख, आसीफ शेख आदी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक यांनी केले होते.
No comments:
Post a Comment