शरद पवार यांनी केला राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्यासंबंधीच्या चर्चेवर पूर्णविराम...
मुंबई:- दिल्ली दौरा झाल्यानंतर अनेक राजकिय पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाल्याने अनेक राजकिय तर्क वितर्क काढले गेले होते अशीच चर्चा पुन्हा रंगत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना
राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्यासंबंधीच्या चर्चेवर स्वत:त्यांनीच पूर्णविराम लावला आहे. शरद पवार यांनी म्हटले की, हे एकदम निराधार आहे की प्रशांत किशोर यांनी माझ्याशी उमेदवारीबाबत चर्चा केली याचा प्रश्नच येत नाही. मला माहित नाही की त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणत्या पटीत गणित केले
आहे. जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा ती भेट अराजकीय होती. 2024 च्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.असे समजले जात आहे की, प्रशांत किशोर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख शरद पवार यांना पुढील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सादर केले जाऊ शकते.प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे.2022 मध्येच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होईल.
अशावेळी देशाला एक नवीन राष्ट्रपतीचा शोध असेल. अशावेळी विरोधक आपल्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. निवडणूक रणनिती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. ही भेट राहुल यांच्या निवासस्थानी झाली होती.या दरम्यान के.के. वेणुगोपाल आणि प्रियंका गांधी सुद्धा तिथे उपस्थित होत्या.प्रशांत किशोर यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा काम केले आहे त्यामुळे त्यांना रणनिती तज्ज्ञ म्हणून संबोधले जाते.
No comments:
Post a Comment