विकृतीचा कळस..६० वर्षाच्या वृद्धयाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 29, 2021

विकृतीचा कळस..६० वर्षाच्या वृद्धयाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

विकृतीचा कळस..६० वर्षाच्या वृद्धयाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार..                             बारामती : बारामती तालुक्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी उंडवडी येथे एका अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असणाऱ्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे आरोप झाल्याने तश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या घटनेनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील ( पणदरे) पवईमळा येथे अल्पवयीन मुलीवर ६० वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केला असल्याची धक्कादायक बातमी आली,
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शेतात
नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील पवईमाळ येथे घडला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अर्जुन जगन्नाथ कांबळे (रा. पवईमाळ) या ६० वर्षीय
वृद्धाला अटक केली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दाखल केली. बुधवारी (दि. २८)
दुपारी पवईमाळ येथे एका शेतात ही घटना घडली. अल्पवयीन पीडित मुलगी शेळ्यांना शेवरीचा पाला आणण्यासाठी गेली होती. यावेळी कांबळे याने तिचा हात धरुन तिला ओढत ऊसामध्ये नेले. तेथे
तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीचा चुलत दीर ऊसाकडे येताना
पाहून कांबळे याने तेथून पळून काढलापीडित अल्पवयीन मुलीकडे कुटुंबियांनी विचारणा केली असता कांबळे याने यापूर्वीही
तिला चापट मारत जबरदस्तीने ऊसात नेवून बलात्कार केल्याचे तसेच
याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझ्या लहान बहिणीला मारुन टाकेन अशी धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले.पीडितेच्या आईने फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी कांबळे
विरोधात बलात्कार व बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण
कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीगणेश
कवितके यांनी कांबळे याला ताबडतोब अटक केली. गुरुवारी (दि. २९) त्याला बारामतीतील न्यायालयात न्यायाधीश डी.बी. बांगडे यांच्यासमोर हजर करण्यात आले.सरकारी वकिल स्नेहल बडवे- नाईक यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगत सखोल तपासाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने कांबळे याला सहा दिवसांची कोठडी सुनावन्यात आली.

No comments:

Post a Comment