पुन्हा एखादा सावकारकीने काढले डोके वर.. देऊळगाव रसाळ येथील चौघांवर गुन्हा दाखल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

पुन्हा एखादा सावकारकीने काढले डोके वर.. देऊळगाव रसाळ येथील चौघांवर गुन्हा दाखल

पुन्हा एखादा सावकारकीने काढले डोके वर.. देऊळगाव रसाळ येथील चौघांवर गुन्हा दाखल.!

वडगाव निंबाळकर:- बारामती तालुक्यातील सावकारी काही केल्या कमी होईना, कोरोनाच्या महामारी ने पुरती मेटाकुटीला आलेला माणूस आज सावकारी, बँक कर्ज, फायनान्स चे हप्ते, भरमसाठ विजबिल ने अक्षरशः परेशान झाला आहे त्यात सावकारी करणारे धनदांडगे बळाचा वापर करून ज्यादा व्याज घेतले जाते यामध्ये अनेकांचे बळी देखील गेले तर अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अश्या सावकारी करणाऱ्या ला पाठीशी घालणार नाही असे सांगितले होते व तश्या सूचना केल्या की अश्या लोकावर कारवाई करा, मग असे असताना अनेक कारवाई सुद्धा झाल्या तरी देखील सावकारीच्या तक्रारी येत आहे, अशीच एक तक्रार वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं.245/2020 महाराष्ट्र सावकारी अधिनीयम 2014 चे कलम  39 45 भा.द.वि.506 नुसार फिर्यादी- सौ. शालन भुजंग वाबळे, वय 54 वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. पवारवस्ती, देऊळगाव रसाळ, ता. बारामती, जि.पुणे,यांनी यामध्ये आरोपी-1) दिपक बापुराव वाबळे, 2) सर्जेराव नाना वाबळे, 3) अनिल लक्ष्मण वाबळे, 4) राहुल रामदास वाबळे सर्व रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती, जि. पुणे. यांच्या विरोधात तक्रार दिली ,दि. 30/10/2017 ते 1 जानेवारी  2021 दरम्यान मौजे  पवारवस्ती, देऊळगाव रसाळ, ता. बारामती, जि.पुणे,या ठिकाणी यातील फिर्यादी यांनी आरोपी अ.नु.नंबर 1 )दिपक बापुराव वाबळे, याच्या कडुन 10 रू टक्याने दोन लाख रू  2017 मध्ये घेतले होते त्या रक्कमे बदल्या फिर्यादी यांना आरोपी अ.ऩ.1 ते 4 हे व्याजाच्या पैशाची मगणी करत होते सदर व्याजाची रक्कम पाच लाख रूपये झाल्याने आरोपी नं 1 ते  4 हे फिर्यादी यांना त्रास देवु लागले तसेच आरोपी अ.नु.नं  1 याने फिर्यादी यांना तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमचे दीड एकर क्षेत्र मला खरेदी खत करून द्या असे म्हणाल्या नंतर फिर्यादी यांनी आरोपी  अ.नं.1  यास दोन वर्षाच्या मुदती करा खरेदी खत करून देतो आम्ही तुमचे पैसे दिल्या नंतर खरेदी खत पलटी करून द्या असे म्हणाले त्यावर त्यांनी होकार दिल्या नंतर फिर्यादी यांनी दिनांक 16/2/2021 रोजी त्यांची जमीन गट नं 482 मधील दिड एकर क्षेत्र दुय्यम निबंधक कार्यालय येथे दिड एकर शेत जमीन सातलाख रूपयामध्ये 2 वर्षाच्या बोलीवर जमीन परत देण्याचे बोलीवर करून दिले   त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये  फिर्यादी हे 7,00,000 /- रू गोळा करून आरोपी अनु नं  1 यांच्याकडे जावुन आमची जमीन परत  पलटी करून द्या असे म्हणाले असता त्याने तुम्ही मला अजुन व्याजासहीत दहा लाख रूपये द्या असे म्हणाला त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास आमच्याकडे एवढी रक्कम नाही असे म्हणाले असता त्याने मी जमीन परत देत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणाल्यालर आम्ही घरी आलो त्यानंतर देवुळ गाव रसाळ येथे येवुन व्याजाने पैसे देणारा इसम नामे राहुल रामदास वाबळे याच्याकडे जावुन आम्ही सण  2020 मध्ये  4 लाख 50,000/- रू मागितले असता त्याचे सावकारकीचे साथीदार  1 ते  4   यांनी संगणमत करुन व्याजापोटी जास्त रक्कम मागुन तेथून आम्हाला हाकलुन दिले. त्यानंतर आम्ही आज पर्यंत वेळोवेळी दिपक बापुराव वाबळे याला तुम्ही आमची जमीन पलटी करुन द्या असे म्हणालो परंतु वरील लोकांनी संगणमत करुन आम्हाला त्रास देऊन तुम्ही आमचेकडून व्याजापोटी घेतलेली रक्कम दिली नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अषी धमकी दिली  वगैरे म।।ची फिर्याद वरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट  बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.स. शेख  हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment