अब.ब.ब..बारामतीत चाललंय काय! माजी उपनगराध्यक्ष सह नगराध्यक्षानी अनैतिक संबंधातून केलंय काय?.... तब्बल दहा वर्षे महिलेवर केलेल्या अत्याचाराच्या व्हायरल बातमीने नागरिकांमधून उलट सुलट चर्चा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

अब.ब.ब..बारामतीत चाललंय काय! माजी उपनगराध्यक्ष सह नगराध्यक्षानी अनैतिक संबंधातून केलंय काय?.... तब्बल दहा वर्षे महिलेवर केलेल्या अत्याचाराच्या व्हायरल बातमीने नागरिकांमधून उलट सुलट चर्चा..

अब.ब.ब..बारामतीत चाललंय काय! माजी उपनगराध्यक्ष सह नगराध्यक्षानी अनैतिक संबंधातून केलंय काय?....                                                                               तब्बल दहा वर्षे महिलेवर केलेल्या अत्याचाराच्या व्हायरल बातमीने नागरिकांमधून उलट सुलट चर्चा..                                                                       बारामती:- नुकताच गेली दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी झळकली आणि हा हा म्हणता बारामतीमध्ये चर्चेला उधाण आले, कारणही तसेच आहे व्हायरल झालेली बातमी ही धक्कादायक होती या बातमीत चक्क माजी उपनगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्याकडून एक अनुचित प्रकार घडला गेल्याचे याबातमीवरून समजते एका पुण्यातील महिलेवर जवळजवळ दहा वर्षे अनैतिक संबंध ठेवून वारंवार अत्याचार केल्याचे पीडित महिलेने सांगितले असल्याचे समजतंय, त्याच्यापासून एक आठ वर्षाची मुलगी झाल्याचे बातमीत उल्लेख केला आहे याबाबत कायदेशीर बाबीची पूर्तता चालू असेल ही पण या बातमीमुळे मात्र बारामतीमध्ये चांगलीच चर्चा रंगली की कोण आहेत माजी उपनगराध्यक्ष?, कोण आहे नगराध्यक्ष? असे म्हणून दबक्या आवाजात अमुक असेल तमुक असेल असा तर्क वितर्क काढला जात असल्याचे समजले, चौकाचौकात,बाजार पेठ मध्ये अश्या चर्चा ऐकावयास येताना दिसले या व्हायरल बातमीमुळे दोन दिवस मात्र चर्चा रंगत होती की, कधी या लोकांची नावे जाहीर होतील ? अश्या निंदनीय घटनेमुळे बारामती मध्ये नाव असे काय होऊ शकतं हे या बातमीमुळे जनमानसात चर्चेचा विषय ठरला असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. या प्रकरणाला पुढे काय वळण लागतेय हे येणारा काळ ठरवेल पण आत्ता मात्र चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment