शिवशंकर स्वामी यांच्या सांगण्यावरून केला खोटा गुन्हा दाखल? युनूस शेख यांचा धक्कादायक खुलासा पत्र... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 30, 2021

शिवशंकर स्वामी यांच्या सांगण्यावरून केला खोटा गुन्हा दाखल? युनूस शेख यांचा धक्कादायक खुलासा पत्र...

शिवशंकर स्वामी यांच्या सांगण्यावरून केला खोटा गुन्हा दाखल? युनूस शेख यांचा धक्कादायक खुलासा पत्र...            बारामती(प्रतिनिधी):- मा. अप्पर पोलीस अधिक्षक एम.आय.डी.सी. बारामती, जि.पुणे.यांना नुकताच  युनुस हुसेन शेख(ड्रायव्हर)रा. निरावागज, ता.बारामती, जि.पुणे यांनी लेखी निवेदन दिले या निवेदनाची प्रति मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सह पत्रकार यांना दिलेल्या लेखी निवेदनात शिवशंकर राजेंद्र स्वामी, रा. रेवन्यु अपार्टमेंट,शिवाजीनगर, पुणे यांपासून झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासामुळे व त्याचप्रमाणे त्यांनी मला जातिवाचक शब्दांचा
वापर करून शिवीगाळ केल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या व जिवे मारण्याची धमकी दिल्याने मला योग्य तो न्याय मिळवून दयावा व शिवशंकर स्वामी यांचेवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करून कडक शासन करण्यात यावे यासाठी सदर तकार अर्ज देत आहे, मी युनुस हुसेन शेख माझे आई, वडिल, पत्नी व मुलासह निरावागज, ता.बारामती,जि.पुणे या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्यास असून मी दि. ७/७/२०२१ रोजी निमगांव या ठिकाणी माझ्या नवीन घराचे काम चालू असल्याने सामान आणण्यासाठी गेलो होतो व तेथुन घराच्या कामासाठी नवीन एँगल व लोखंडी पाईप घेवून माझी मालकी हक्काची(पिक-अप)गाड़ी एम.एच.४२.ए.एम.८७६९ मध्ये भरून घरी निघालो असताना मला माझ्या मामा नामे बुढन सौदागर यांचा फोन आला की, तुझ्या आजीची तब्येत खुप खराब आहे व ती सतत तुझी आठवण काढत आहे म्हणून एकदा येवून भेटून जा. त्यामुळे मी भावूक होवून माझ्या आजीला भेटण्यासाठी गवारफाटा या ठिकाणी माझ्या आजीला भेटण्यासाठी गेलो व त्यानंतर
काही वेळ मी त्याठिकाणी आजी व मामा बरोबर गप्पा मारत बसलो होतो. थोडया वेळाने मी माझ्या घरी जाण्यासाठी निघालो असता आजीने सांगितले की बाळा थांब आता जेवण करूनच घरी जा. त्यानंतर मी जेवण्यासाठी थांबलो व थोडयावेळाने जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो असता त्याठिकाणी म्हणजेच माझ्या आजीच्या घरातच बाबूलाल शेख हा
एका पोलिस हवलदार व शिवशंकर स्वामी यांच्या बरोबर घरी आला व शिवशंकर स्वामी यांनी मला विचारले की बाहेर लागलेली पिक-अप गाडी तुझी आहे का तेंव्हा मी उत्तर दिले की, हो ती गाडी माझी आहे व त्यानंतर त्या हवालदारांनी मला घराबाहेर बोलावून घेतले तेंव्हा त्याठिकाणी महेबूब शेख मला का बोलावून घेतले म्हणून विचारपूस केली असता त्यांनी उत्तर दिले की आम्ही पुढे नाल्याजवळील झाडीत अवैध कत्तलीसाठी आणि आणलेल्या जनावरांजवळ रेड केलेली आहे. तेंव्हा सदर जनावरे पांजरपोळ याठिकाणी पाठविण्यासाठी गाडीची आवश्यकता आहे तेंव्हा तुझी गाडी भाडयाने दे असे त्यांनी मला एकदम धमकीच्या तथा रूबाबाच्या भाषेत सांगितले व सांगितले की, आम्ही तुला रक्कम रू. ४०००/- गाडी भाडे देतो त्यामुळे मी घाबरून त्यांना होकार दिला त्यांनी मला माइ्या गाडीतील सामान माझ्या आजीच्या घरीच खाली करण्यास भाग पाडले व मला रेड केलेल्या ठिकाणी घेवूने चालले असताना त्याठिकाणी ख्वाजा शेख हे देखिल उपस्थित होते त्यांनी देखील मला शिवशंकर स्वामी यांच्या व पोलीसांच्या सोबत जाताना पाहिले आहे. त्यानंतर त्याठिकाणी आम्ही गेल्या नंतर त्यांनी मला जनावरे गाडीत भरण्यास सांगितले व जनावरे गाडीत भरते वेळी त्यांनी माझा त्यांचे मोबाईल मध्ये व्हिडीओ देखिल बनवला मी त्यांना विचारले की तुम्ही व्हिडिओ का बनवता तेव्हा त्यांनी उत्तर दिले की हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाही जनावरांच्या पुराव्यासाठी बनवत आहोत व त्यानंतर मी जनावरे घेवून केडगांव येथिल पांजरपोळ येथे जाण्यास सांगितले व त्याठिकाणी देखिल शिवशंकर स्वामी हे देखील आलेत.त्यानंतर मी सर्व जनावरे केडगांव येथिल पांजळपोळ मध्ये उतरवून घेतली व गाडीचे भाडे शिवशंकर स्वामी यांना रक्कम रूपये ४०००/- मागितले असता, त्यांनी मला सांगितले की, तुला भाडे बारामती पोलिस स्टेशन मध्ये जा साहेब देतील त्यानंतर त्यांचे ऐकून मी गाडीकडे जात असताना शिवशंकर स्वामी माझे मागे आले व सांगितले की, "तु कुरेशी लोकांचे भाडे मारतो असे मला सर्व माहीत पडले आहे. तेंव्हा तु मला खबर देत जा की, तु तेंव्हा कुणाचा माल भरून कोठे जाणार आहे, मी तुला एका खबरचे रक्कम रूपये १००००/- देईल", त्यावर मी त्यांना उत्तर दिले की असली कामे करत नाही. तेंव्हा त्यांनी मला परत दुसरी गोष्ट सांगितली की, "आज जी जनावरे पांजरपोळ ला सोडली आहेत ती कासम कुरेशी यांची आहेत. असा जबाब पोलीसांना दे पोलीसांचा जबाब झाल्यानंतर मी तुला रक्कम रूपये ५००००/- देतो" त्याला देखिल मी नकार दिला, त्यानंतर पुन्हा त्यांनी मला सांगितले की, "असे भाडे मारून कधी पर्यंत चिल्लर मध्ये कमवणार, ज्याप्रमाणे राजू हसन
शेख, सुदृदाम दादण शेख, बाबूलाल इमाम शेख हे माझे खबरी आहेत तसा तु देखिल हो व माझी साथ दे, तुला मी खूप पुढे घेवून जाईल"' यावर देखिल मी त्यांना नकार दिला, तेंव्हा लगेचच शिवशंकर स्वामी यांनी मला घाणेरडया भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व
सांगितले की, "तुम्ही मादर** मुसलमान *** लोग भारतातून निघून जा, मी तुम्हांला महाराष्ट्रात देखिल राहून देणार नाही तुम्हा सगळयांना पेटवून देवून जिवे मारून टाकणार, मी संपूर्ण महाराष्ट्र हा हिंदू राष्ट्र बनवणार आहे, तुम्ही *** लोकांना महाराष्ट्रातून हकलून देणार आहे तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुम्ही असे जातीवाचक शब्दांचा वापर करू नका मी कुरेशी नसून एक साधा मुसलमान आहे. तुम्हा सगळयांना मुसलमान लोकांना का शिवीगाळ करत आहात, तेंव्हा त्यांनी लगेचच मला मारहाण करण्यास सुरूवात केली व कसेबसे मी त्याठिकाणहून निघालो व हया सर्व प्रकाराची तक्रार करण्यासाठी व गाडीचे भाडे घेण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला गेलो असता लगेचच माझ काही एक शब्द न ऐकता, मला कुठलाही प्रकारची संधी न देता मला लगेचच शिवशंकर स्वामी यांच्या बोलण्यावरून डी.बी.रूम मध्ये बसवून कासम कुरेशी कुठे आहे अशी विचारपूस करण्यास सुरूवात केली व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर पोलीसांनी मला रात्रभर बसवून ठेवले
व दुसर्या दिवशी सकाळी मला सरकारी दवाखाण्यात घेवून गेले व माझे मेडिकल करून लगेचच माझा काही न ऐकता त्यांच जनावरांच्या गुन्हयांत आरोपी करून मे.न्यायालयासमोर हजर केले, तेंव्हा देखिल मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा की, माझी काही एक चूक नाही आहे तरी देखिल शिवशंकर स्वामी यांच्या सांगणेवरून माझेवर खोटा गुन्हा दाखल
करण्यात आला.तरी, माझी आपणांस नम्र विनंती की, शिवशंकर स्वामी यांनी जो माझ्यावर अन्याय करण्यास भाग पाडले व जातीवाचक शब्दांचा वापर करून मला मारहाण व शिवीगाळ केलेली
आहे त्याचप्रमाणे मला खोटया गुन्हयात दुषित वृत्तीने अडकविण्याचा कट रचलेला आहे.त्याचा विचार करण्यात यावा व शिवशंकर स्वामी यांचेवर योग्य त्या कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व आशा करतो की, शिवशंकर स्वामी यांच्या सतत अशा कृत्यामुळे
समजात तेढ निर्माण होत आहे. सर्व साधारण माणसांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत
आहे, या सर्वांमधून महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम दंगल होतील याचा देखिल विचार करण्यात यावा आणि सदर बारामती शहर पोलिस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर ३५९/२१ या गुन्हयाचा पुन्हा तपास करण्यात यावा व मला योग्य तो न्याय मिळवून दयावा हि विनंती.या विनंती पत्राचे निवेदन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून सत्य परिस्थिती काय आहे,कश्या प्रकारे पिळवणुक होतेय कसे खोटे गुन्हे दाखल होतात हे त्याने दिलेल्या पत्रावरून दिसून येत असे तरी कायदा नेहमी सत्याची बाजू मांढणारा असतो तो नक्कीच निरपराध असणाऱ्याना न्याय देईल असे अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलून दाखविले.

No comments:

Post a Comment