मध्य प्रदेश मध्ये १८ कोटी ५० लाख रूपयांच्या फसवणूकीतील आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने अटक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

मध्य प्रदेश मध्ये १८ कोटी ५० लाख रूपयांच्या फसवणूकीतील आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने अटक

मध्य प्रदेश मध्ये १८ कोटी ५० लाख रूपयांच्या फसवणूकीतील आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने अटक
बारामती:- दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भोपाळ या कंपनी व पंजाब नॅशनल बॅकेचे १८ कोटी ५० लाख रूपयांचे चेक क्लिअरनिंग करून
सदरचे चेक आडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदती ने ओडीसा येथील एका इसमाच्या करंट आकाउंट वरती टाकुन फसवणूक केले बाबत स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) येथे गुन्हा रजि क १७१/२०२० भादंवि ४२०,४०८, ४०७, ४७१, १२० य प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी आडीबीआय बँकेचे मॅनेजर सरोज महापात्रा यास यापुर्वी अटक केली असुन गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी योगेश अजित काटे
र. काठेवाडी ता. बारामती जि. पुणे हा गुन्हा घडलेपासुन फरार होता. सदर आरोपीचा शोध घेणे कामी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मदत मागितलेने पोलीस निरीक्षक ढवाण यांनी तात्काळ सपोनि पोरे,
पोना बंडगर, पो का कांबळे,पो कॉ सपकळ मपोकॉ काळे यांना सुचना देवुन आरोपी नामे योगेश अजित काटे यास ताब्यात घेण्यास सांगितले.
त्याप्रमाणे वारामती तालुका पोलीस ठाणेकडील पथकाने तांत्रीक बाबीवरून आरोपी यास मोरगाव रोड ता. बारामती. येथुन ताब्यात घेवुन पुढील तपास कामी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री.डॉ अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री.मिलींद मोहीते अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, श्री.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती , श्री महेश ढवाण  पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस नाईक बंडगर ब नं २२९७, पोलीस अंमलदार कांबळे ब नं २७४८ पोलीस अंमलदार सपकळ ब नं ४३३ महिला पोलीस अंमलदार काळे ब नं २५१७ यांनी केलेला आहे.

No comments:

Post a Comment