बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करुन आरोपी केला जेरबंद . - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करुन आरोपी केला जेरबंद .

बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी  बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करुन आरोपी केला जेरबंद .
                                                                       बारामती:- गेल्या महीनाभरापुर्वी बारामती परीसरामध्ये माळेगाव बुाा येथे गोळीबार केल्याच्या घडना घडल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश ढवाण यांनी बारामती परीसरात कोंबिंग आॅपरेशन तसेच नाकाबंदी करून रेकाॅर्ड वरील आरोपी चेक करणेची मोहीम आखली व त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन गुन्हे पथकाला केले त्याप्रमाणे गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पो स्टे हददीत कोम्बीग आॅपरेशन, रेकार्डवरील आरोपी तसेच माहितीगार गुन्हेगार चेक करण्याची मोहीम चालु असताना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली कि खुनाचे गुन्हयातील जामीनावर असणारा आरोपी नामे शुभम विकास राजापुरे हा येरवडा जेल मधुन पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे.सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत असतो.अशी खात्रीलायक बातमी मिळालेवर पो.नि महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन सुचना देवुन त्यास ताब्येत घेणेचे आदेश दिले, त्याप्रमाणे गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी माहती घेवुन शुभम राजापुरे हा तांदुळवाडी मध्ये येणार असल्याची माहीती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचुन शुभम राजापुरे याला ताब्यात घेवुन त्यांचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव शुभम विकास राजापुरे वय 24 वर्षे रा.मुर्टी ता.बारामती जि.पुणे असे सांगितले. त्याची  अंग झडती घेतली असता त्याचेकडुन कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल ,त्यामध्ये मॅग्झीन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करणेत आले आहे. सदर पिस्टल अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांने परवाना नसल्याबाबत सांगितले.सदर आरोपी ताब्यात घेवुन त्याचेवर आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
    सदर कारवाई पोलीस अधिक्षक मा अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते ,उपविभागीय अधिकारी श्री.नारायण शिरगावकर  बारामती तालुका पो.स्टे चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखडे,रणजित मुळीक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment