संभाजी महाराजांनी धनगर आरक्षणात लक्ष घालावे ==हेमंत पाटील - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

संभाजी महाराजांनी धनगर आरक्षणात लक्ष घालावे ==हेमंत पाटील

संभाजी महाराजांनी धनगर आरक्षणात लक्ष घालावे ==हेमंत पाटील 
==========÷===========
पुणे:- ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी संभाजी महाराजांनी लक्ष घालुन मराठा समाजाच्या पदरात काही मागण्या मान्य केल्या त्याच्या 25% जरी धनगर समाज आरक्षणासाठी लक्ष घातले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले संभाजी महाराज या मोहीमेत उतरण्यासाठी हेमंत पाटील त्यांना कोल्हापूर येथे जाऊन भेटणार आहेत राज्य सरकार ने मराठा व ओबीसीं समाजासाठी खुप काही केले आहे परंतू महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्या पासुन धनगर समाजासाठी काहीच केले नाही हेमंत पाटील संभाजी महाराजांनी भेटल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस चे राहुल गांधी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  अशोक चव्हाण यादी नेत्यांना भेटुन धनगर समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळेल या बाबत ते यांचा कायदेशीर सल्ला घेणार आहेत

No comments:

Post a Comment