महा डिजिटल मीडिया असोसिएशन(MDMA) च्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अमित बगाडे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

महा डिजिटल मीडिया असोसिएशन(MDMA) च्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अमित बगाडे

महा डिजिटल मीडिया असोसिएशन(MDMA) च्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अमित बगाडे                                                                                                                    बारामती :- महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA) या स्वयं नियामक संस्थेमध्ये आज रोजी अमित लक्ष्मण बगाडे यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली.


निवड ही अद्वैत चव्हाण यांनी दिनांक 2/7/ 2021 रोजी संध्याकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या वकील पत्र यूट्यूब चैनल वर कार्यक्रम घेऊन नियुक्ती करण्यात आली त्यावेळी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष नाईक नवरे सर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदेश शिंदे सर हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत पाच जिल्हाध्यक्ष व एक शहराध्यक्ष पद देण्यात आले अशाप्रकारे निवड करून ते घोषित करण्यात आले .

सातारा जिल्हा अध्यक्ष पदी दादासाहेब चोरमले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सुशांत पवार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी आशिष रईज खानदेश जळगाव जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल पाटील बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित लक्ष्मण बगाडे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तसेच सोलापूर शहराध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोरते अशाप्रकारे सर्वांची निवड अधिकृत करून अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडी अद्वेत  चव्हाण सरांनी केलेला आहे..

प्रत्येक जिल्ह्यातल्या अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी विश्वासाने जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने नक्कीच पार पडतील व पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेतील त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तसेच महा डिजिटल असोसिएशन (MDMA) माध्यमातून सरकार दरबारी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून पत्रकार बंधूंना हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही सर्वजण करणार आहोत.

तसेच पुणे जिल्हा ग्रामीण तालुका कार्यकारणी तयार करायचे आहे इच्छुकांनी 7888127878 या नंबरला व्हाट्सअप करून आपली माहिती कळवावे.

No comments:

Post a Comment