*एकता इंग्लिश मिडीयम स्कूल बांधकामासाठी पी.ए.इनामदार यांचेकडून 1 कोटीचा निधी*
बारामती : शिक्षण महर्षी तथा दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार यांनी बारामती येथे नावारूपाला आलेल्या एकता इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अत्याधुनिक होणार्या बांधकामाला 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. त्यापैकी 25 लाखाचा पहिला धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते दि.21 ऑगस्ट 2021 रोजी संस्थेचे अध्यक्ष आलताफ सय्यद, उपाध्यक्ष सुबहान कुरेशी, सचिव परवेज सय्यद यांच्याकडे सुपूर्द केला.
ना.पवार यांनी बोलताना सांगितले की, सदर निधीचा पुरेपूर वापर करून बारामतीच्या वैभवात भर पडेल अशी वास्तु उभी करावी. पी.ए.इनामदार सारख्या दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यामुळे शैक्षणिक मदत होत आहे. यावेळी तमाम बारामतीकरांच्या वतीने पी.ए.इनामदार यांचे आभार ना.अजित पवार यांनी मानले. सदरचा निधी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे ना.अजित पवार यांच्या हस्ते पी.ए.इनामदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment