*पुणे विभागातील 17 लाख 94 हजार 460 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*
*विभागात कोरोना बाधित 18 लाख 67 हजार 267 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 6: पुणे विभागातील 17 लाख 94 हजार 460 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 67 हजार 267 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 313 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 494 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 89 हजार 799 रुग्णांपैकी 10 लाख 62 हजार 369 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 152 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.48 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 22 हजार 558 रुग्णांपैकी 2 लाख 9 हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 79 हजार 560 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 346 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 591 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 78 हजार 630 रुग्णांपैकी 1 लाख 67 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 6 हजार 921आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 96 हजार 720 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 466 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 729 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 87 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1019 सातारा जिल्ह्यात 993, सोलापूर जिल्ह्यात 595, सांगली जिल्ह्यात 667 तर कोल्हापूर जिल्ह्यात 813 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 221 आहे. पुणे जिल्हयामध्ये 920, सातारा जिल्हयामध्ये 684, सोलापूर जिल्हयामध्ये 663, सांगली जिल्हयामध्ये 606 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 348 रुग्णांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 32 लाख 17 हजार 698 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 67 हजार 267 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
No comments:
Post a Comment