सावकारी पोसली जातेय! भाग 2. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 15, 2021

सावकारी पोसली जातेय! भाग 2.

सावकारी पोसली जातेय! भाग 2.
.................................................. .................................................
आघाडी सरकारच्या काळातील उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले स्वर्गीय आर आर पाटील आबा यांनी सावकारी करणाऱ्यांना, कोपरापासून ढोपरापर्यंत,सोलून काढण्याची भाषा त्यावेळी केली होती.अर्थातच तत्कालीन स्वर्गीय गृहमंत्री.आर.आर पाटील आबा यांच्या अकाली जाण्याने,खाजगी सावकारी करणाऱ्या अनेक, सावकारांच्या कोपरापासून ढोपरावरती मूठभर मांस चढले आहे.एकविसाव्या शतकापर्यंत ते आजा मीतीस अखेरपर्यंत!या सावकारीचे मूळ वाढण्याचे कारण,केंद्र व राज्य सरकार अंतर्गत असणाऱ्या, राष्ट्रीयीकृत सहकारी बँका,व या बँकिंग सेक्टर मध्ये काम करत असणाऱ्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा मस्तवालपणा,सावकारीच्या दाराच्या उंबऱ्या पर्यंत अनेकांना जाण्यास भाग पाडतो.अशा निष्ठूर मनाच्या अनेक बँकेच्या, अधिकारी व कर्मचारी यांना देखील कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढल्याशिवाय,शेतकऱ्यांची, कष्टकरी व पीडित सावकार ग्रस्तांची,दुखणी समजून येणार नाहीत.केंद्र व राज्य सरकार अंतर्गत, सुशिक्षित बेकार उद्योजक व्यापारी लघु उद्योजक मध्यम उद्योजक कुटीर उद्योजक व महिला बचत गटातील विविध छोटे-मोठे काम करणाऱ्या यांना,सरकार खात्या अंतर्गत असणाऱ्या विविध बँका,यांचा खूप मोठा हातभार लागतो.
मात्र जबाबदारीचे भान विसरणा रे या बँकांचे, वरिष्ठ अधिकारी हे केवळ फुगीर आणि खोटी आकडेवारी तत्कालीन जिल्ह्याच्या, जिल्हाधिकारी यांना सादर करत असतात.
केंद्र सरकारच्या खात्याअंतर्गत भारतीय रिझर्व बँक,सिडबी अर्थात सूक्ष्म व लघु उद्योग विकास बँक, व यांच्या अंतर्गत नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या, व नव्याने स्थापन झालेल्या मुद्रा बँक,तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेली नाबार्ड बँक,या योजना सबसिडी व लाभ देने कामी कार्यरत आहेत.या बँकातील अनेक चांगले व गुणवंत अधिकारी हे नेहमी कार्यरत राहतात.मात्र काही अधिकारी हे परप्रांतीय असल्याने,सामाजिक तळागळातील गाव गाड्यावरचा त्यांना अभ्यास नसल्याने,सरकारी लालफितीच्या नियमाला स्वतःला बांधून घेत,ते नेहमी श्रीमंत शेतकरी व्यापारी,उद्योजक यांची धुनी भांडी करताना दिसून येतात.गलेलठ्ठ सरकारी पगार घेऊन देखील गाव गाड्या वरच्या गरीब शोषित पीडित कष्टकरी यांचे सुखदुःख समजून न घेता,अशा अनेक आवलादि या नियमबाह्य काम करताना दिसून येतात.महाराष्ट्रामध्ये अनेक युवक युवती बचत गटातील अनेक महिला, नवीन तयार होणारे उद्योजक व तोट्यात गेलेले उद्योजक यांना,सांभाळून न घेता त्यांचे म्हणणे समजून न घेता,लाल फितीत तील नियम अटी यांचा  समझोता करून, केवळ वशिलेबाजी होणाऱ्या कर्ज प्रकरणांचा निपटारा करताना असे अनेक, महाभाग, मनमानी कारभार महाराष्ट्र राज्य मध्ये करीत आहेत.खास करून पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाडा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी उद्योजकांनी तसेच लहान व मध्यम, उद्योग करणाऱ्या युवक-युवती यांना, कर्ज प्रकरणापासून सतत डावलले गेले आहे.विदर्भ व मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील अनेक उद्योजकांनी खाजगी सावकाराला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत.यामध्ये तर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या झाल्याचे आज काल दिसून येते!

रोम चा, निरो देश उपाशी पोटीजळत असताना, रोमचा राजा पिपाणी वाजवतो,तसेच लोकांना भुकेपोटी ब्रेड खावा असा निर्लज्जपणाचा सल्ला देत होता होता.केंद्र व राज्य सरकार अंतर्गत असणाऱ्या बँकिंग सेक्टर मध्ये अनेक आवलादि या रोमच्या या राजाच्या, सारखे, निष्ठूर मनाच्या आहेत. श्रीमंतांची धुणीभांडी करून त्यांना कर्जे देऊन ते बुडवून त्यांची सेटलमेंट लावून,त्यांच्या कर्जाच्या माफी वर शिक्का मारून त्यांना पुन्हा,कर्ज देणाऱ्या अशा अनेक आवलादिना,स्वर्गीय गृहमंत्री आर आर पाटील आबा यांच्या भाषेत कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढली पाहिजे! सामान्य मध्यमवर्गीय गरीब दिन दलित शोषित पीडित शेतकरी वा लघु व मध्यम उद्योजक, यांना त्यांचे जीवन हे शांततापूर्वक जगावयाचे असते! त्यांच्या आर्थिक सुख साधन संपत्ती साठी,राज्य व केंद्र सरकार विविध योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बँकांना दर महिन्याला, सूचना देत असते.मात्र परावलंबी असलेल्या व आपमतलबी पणाने,तहहयात केवळ "नोकरी" या शब्दाचा अर्थ आहे असं समजून काम करणारे,वरील  रोमच्या राजाचे वारसदार,अनेकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असतात नकळतपणे! केंद्र सरकारच्या डिजिटल वेबसाईट वरती, दाखवलेल्या अनेक साध्या साध्या योजना सबसिडी, लाभ,या योजना, देण्यासाठी अशा अनेक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारलेला असतो.
यामुळे गाव गाड्या वरती, सावकारी व्याजाची वसुली करणारा पांडबा सावकार,याच्या बुलेटची पुंगळी गावातून फिरत असताना, त्याच्या बुलेट चा येणारा आवाज,सावकारग्रस्त कर्जदार शेतकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवून जातो.
राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या बाबींची गंभीरपणे नोंद घेणे गरजेचे आहे.

कारण या देशातील लोकशाही ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी लोकांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी,उद्योग व्यापार करणाऱ्या त्या उद्योजकांचे साठी आहे.
प्रशासनातील खूप चांगले अधिकारी व निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे अतिशय तळमळीने व चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असतात,
 मात्र काही चापलुसी करणारे चमचे,
माप काढणारी आणि गाव वाड्यावरची टेलर, रायजादे,रायसाहब...............
( unwanted suggestion)
करणारी मंडळी,हिरव्या झाडाखाली चळवळी करणारे अनेक,कार्यकर्ते हे,या अर्थकारणाशी निगडित,असलेल्या सावकारीचा समस्येवर ती आवाज,न देणार्‍या बँकांच्या कर्जाच्या साठी,
झटताना व झगडताना दिसून येत नाहीत. कारण ते  स्वहित जोपासण्यासाठी संघटना पोसण्याची आयुष्यभर काम करत असतात.अशा अनेक संघटना या पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या छत्री आळंबी सारख्या असतात. निवडणुका आल्या की अशा अनेक छत्री आळंबी यासारख्या संघटना उगवतात व त्या राजकारण राजकीय वेळ निघून गेल्यावर आपोआपच तुडवल्या जातात.
या सावकारग्रस्त कर्जाला बळी पडलेल्या अनेकांना दिलासा देण्याचे काम,पोलिस प्रशासनातील चांगले आणि गुणवंत अधिकारी यांनी व राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशासनातील मोठ्या अधिकारी वर्गाने व निवडून गेलेल्या चांगल्या लोकप्रतिनिधींनी, जबाबदारीने करणे खुप काळाची गरज आहे! अन्यथा दाबून राहिलेला  विद्रोह ज्या दिवशी वरती येईल त्या दिवशी,रशियासारखे क्रांती करण्यासाठी लोक लाखोच्या संख्येने रस्त्यावरती येतील.
व लवकरच तो दिवस दूर नसेल.
..........लेखक.श्री तानाजी सखाराम कांबळे. मो-8080532937.....................................

No comments:

Post a Comment