*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी देसाई इस्टेट मध्ये संपन्न*
बारामती:-रविवार दिनांक १ ऑगस्ट, २०२१ रोजी बारामती नगरी मधील देसाई इस्टेट या ठिकाणी *सकाळी 10 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली*. कोरोना काळातील शासनाने ठराऊन दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व देसाई इस्टेट मित्र परिवाराच्या वतीने जयंती व पुण्यतिथी या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्राचे बारामती विभागाचे संपादक अमोल यादव व शेतकरी योद्धा साप्ताहिकाचे संपादक योगेश नालंदे यांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका व राष्ट्रवादी युवती काँग्रेस बारामती शहराच्या अध्यक्षा अरतीताई शेंडगे उपस्थित होत्या. थोर महापुरुषांचे स्वातंत्र्य चळवळीतील महत्व या समयी माजी नगरसेविका आरतीताई शेडगे यांनी महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घोडे (सर) यांनी केले तर राष्ट्रवादी युवक कांग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष व आयोजक विशाल पोपटराव जाधव यांनी आपल्या आभार पर मनोगतातून महापुरुषांची चरित्रे लोकांनी अभ्यासाने व त्यांचे समाजासाठी दिलेले योगदान याबाबत उपस्थित समुदायाला महापुरुषांच्या कार्यांची माहिती दिली व उपस्थितांचे आभार व्यक्त करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment