बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी २ आरोपी व १ अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 11, 2021

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी २ आरोपी व १ अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी २ आरोपी व १ अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त
बारामती:-  शहर पोलीस स्टेशन हदीत वेगवेगळया ठिकाणी मोटार सायकल चोरी बाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरचे गुन्हे उघडकीस आननेचे दृष्टीने मा.पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकास सुचना दिल्या होत्या त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तपास करत आसताना बातमीदारामार्फत मिळाले बातमीचे अनुशंगाने एक विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार १) अमर मोहम्मद तांबोळी वय २४ वर्षे रा. तांदुळवाडी बारामती जि.पुणे २) अल्ताफ उर्फ ओंकार जमीर शेख वय २० वर्षे रा.खंडोबानगर बारामती जि.पुणे यांनी मिळुन १)बारामती शहर २)वालचंद नगर पोलीस ठाण्याचे हददीत मोटार सायकल चोरल्याची कबूली दिली. त्याचेकडुन तपासादरम्यान, २,६०,०००/-रू किंमतीच्या एकुण ०७ मोटारसायकली ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने हस्तगत केल्या आहेत.त्यामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन कडील मोटारसायकल चारीचे ०६गुन्हे,वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील मोटारसायकल चोरीचा ०१ गुन्हा असे एकुण ०७ मोटारसायकल चोरीचे गन्हे बारामती शहर गुन्हे शोध पथकाने उघडकीस आनले
आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री .मिलीद मोहिते सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो,पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके,रामचंद्र शिंदे,सुहास लाटणे,संजय
राऊत,तुषार चव्हाण,यांनी केली.बारामती श्हर पोलीस जाधव,पो.का.अकबर शेख, दशरथ इंगोले,अजित राऊत, तुषार चव्हाण यांनी केली.

No comments:

Post a Comment