पालखी मार्गातील जागेचा मोबदला मिळवून देण्यासाठी चालू आहे टक्केवारी.? प्रशासकीय भवन मध्ये असे कोण आहे वाझे.! म्हणे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे माझे.!! बारामती(प्रतिनिधी):- बारामतीचा विकास झपाट्याने वाढत चालला असला जरी खरा पण भ्रष्टाचार वाढत चालला असल्याचे अनेक वृत्तपत्र च्या माध्यमातून समजतंय, अश्या परिस्थितीत कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असताना लोकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे अश्या वेळी शासकीय दरबारी जर पिळवणूक होणार असेल तर काय अवस्था होते हे अश्या नागरिकांना विचारा त्यांच्या तोंडून पहिल्यांदा अपोअप वाईट शब्द कानावर पडतात प्रत्यक्ष अनुभवल्यास लक्षात येईल याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतील. असेच एक आत्ता उदाहरण घडत आहे याबाबत पत्रकार संतोष जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्या लक्ष्यात ही बाब आणून दिली आहे बघूया यामध्ये किती दखल घेतली जाईल ते ? विकास होत असताना बारामती दौड, इंदापूर हद्दीतील काही जमिनी पालखी मार्ग होणार आहे म्हणून शासनाने जाहीर केले याबाबत प्रत्येक जमीन मालकांना नोटिसा दिल्या,त्या बाबत जमिनीचा मोबदला देखील देण्यास सुरुवात झाली आणि प्रशासकीय भवन येथील इमारतीत एकच झुंबड उडाली आणि याचाच फायदा घेऊन काही वाझे(एजंट) तयार झाले,किचकट कागदोपत्री प्रकिया असल्याने व आपल्याला लवकर मोबदला मिळावा या आशेपोटी नाईलाजस्तव या एजंट कडे फाईल देतात आणि त्यातून टक्केवारी ठरली जाते हे उघड उघड असल्याचे काही शेतकरी बोलताना दिसते तर एका शेतकरी मुलाने अक्षरशः या किचकट प्रकियेला वैतागून स्वतःचे कपडे काढून याच इमारती वरून उडी मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी त्यास अडविले व समजून सांगितले, अशी जर वेळ येत असेल तर कसे होणार अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे तक्रार झाली असून दखल न घेतल्यास व एजंट गिरी बंद न झाल्यास नाईलाजाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्याकडे ज्यांच्या फाईल क्लिअर करण्यासाठी लाखो रुपये घेतले गेले अथवा मागणी केली त्यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे,तर या कार्यालयात सतत येत असणारे हे एजंट कोण यांची चौकशी व्हायला पाहिजे यांच्या माध्यमातून टक्केवारी कुणाला जातेय याची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे याबाबत लवकरच काही पुरावे हाती आलेले आहे याच्या आधारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या प्रतिक्रिया देणार आहे, यासाठी अश्या गळचेपी झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील अंकी***
Post Top Ad
Friday, August 13, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
पालखी मार्गातील जागेचा मोबदला मिळवून देण्यासाठी चालू आहे टक्केवारी.? प्रशासकीय भवन मध्ये असे कोण आहे वाझे.! म्हणे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे माझे.!!
पालखी मार्गातील जागेचा मोबदला मिळवून देण्यासाठी चालू आहे टक्केवारी.? प्रशासकीय भवन मध्ये असे कोण आहे वाझे.! म्हणे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहे माझे.!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment