स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवन येथेप्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 15, 2021

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवन येथेप्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासकीय भवन येथे
प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण 

बारामती दि. 15 :- भारताच्या स्वातंत्र्य  दिनाच्या 74 वर्धापन  दिनानिमित्त  प्रशासकीय भवन, बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 
याप्रसंगी बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, मा. उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, उपविभागीय पोलीस अधिकारी  नारायण शिरगावकर,  सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,   उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड,   सहाय्यक  निबंधक मिलिंद टांकसाळे,  निवासी  नायब तहसिलदार  धनंजय जाधव, नायब तहसिलदार सरोदे, नायब तहसिलदार महादेव भोसले,  नायब तहसिलदर  पी. डी. शिंदे, नगरपरिषदेचे सदस्य,  आदी मान्यवर, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य  सैनिक, पत्रकार, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
ध्वजारोहणानंतर प्रांताधिकारी कांबळे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकरली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

No comments:

Post a Comment