वाघ्या मुरळी परिषदेच्या उमरी तालुकाध्यक्ष पदी बालाजी देबनवाड तर उपाध्यक्ष पदी गोविंद सुरणे यांची निवड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

वाघ्या मुरळी परिषदेच्या उमरी तालुकाध्यक्ष पदी बालाजी देबनवाड तर उपाध्यक्ष पदी गोविंद सुरणे यांची निवड.

वाघ्या मुरळी परिषदेच्या उमरी तालुकाध्यक्ष पदी बालाजी देबनवाड तर उपाध्यक्ष पदी गोविंद सुरणे यांची निवड.

        उमरी प्रतीनीधी-शेख आरीफ

उमरी:- वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या उमरी तालुका अध्यक्षपदी बालाजी देबनवाड यांची तर उपाध्यक्षपदी गोविंद सुरणे यांची निवड करण्यात आली आहे आपण गेली अनेक वर्षे पिढ्यान पिढ्या मल्हार मार्तंड ची आई तुळजाभवानी मातेची धार्मिक व सांस्कृतिक कार्य कुलधर्म कुलाचार खंडोबा देवाची पूजाअर्चा जागरण गोंधळ करत आहात ज्यामुळे महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जागरण गोंधळ कार्यक्रम करणाऱ्या वाघे मंडळ पार्टीशी आपल्या जवळून संपर्क आहे जागरण गोंधळ धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवकर याबरोबर जागरण गोंधळात सादर केल्या जाणाऱ्या लोककलेच्या माध्यमातून बहुजनांची प्रबोधनही करत आहात आपल्या संपर्कचा फायदा जागरण गोंधळ लोककलेला शासनदरबारी मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी निश्चितच फायदा होईल अशी आशा वाटते सध्या महाराष्ट्र राज्यात जागरण गोंधळ लेखणी चालवणार्‍या साहित्यिकांसाठी साहित्य परिषद आहे त्याचबरोबर नाट्य परिषद आहे शाहीर परिषद तमाशा परिषद आहे पण वाघेमुरळी परिषद आजवर नव्हती पण आता आपल्या सहकार्याने आपल्या माध्यमातून साकार होत आहे वरील सर्व परिषदा प्रमाणे वाघ्या-मुरळी परिषदेला शासन न्याय मिळविण्याचे काम आपण संघटनात्मक जबाबदारी घेतलात अशी आशा संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केली वरील परिषदांना शासनाकडून अनुदान कलावंतांना मानधन मिळावे अशा अनेक समस्यांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे मत नवनिर्वाचित कार्यकरनी यांनी व्यक्त केले आहे परिषदेच्या माध्यमातून आपल्याला संघटितरीत्या लढा करायचा आहे याकामी आपण आम्हाला सक्षम वाटला म्हणून आम्ही आपली आपली निवड केली आहे तरी आपण आपल्या समाजातील वाघ्या मुरळी करणाऱ्या सर्व लहान थोरांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या न्याय हक्कासाठी चांगले कार्य करावी अशी आशा माननीय संस्थापक-अध्यक्ष मार्तंड साठे सर यांनी व्यक्त केली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा.मार्तंड साठे सर यांच्या नेतृत्वाखाली उमरी तालुकाध्यक्ष बालाजी देबनवाड गोळेगावकर, यांची नियुक्ती करण्यात आली तर गोविंद सुरने हातनीकर,
उपाध्यक्ष उमरी तालुका, वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य बालाजी म्याकले कार्याध्यक्ष बोरजुन्नीकर, लिंगोजी बालाजी कराडे प्रमुख सल्लागार निमटेककर,शिवाजी मार्तंड जंगले  गोळेगावकर प्रमुख संघटक,मार्तंड कोमराजी कमळे करकाळेकर उप सचिव,खंडू कोमराजी शिगंळे‌ तळेगावकर तालुका सचिव, गंगाराम हैबती वाघमारे भायेगावकर तालुका सचिव,
माणिक कोंडिबा संभोड तळेगावकर तालुका सरचिटणीस, विठ्ठल मारोतराव कानगुले तालुका सचिव यांची नियुक्ती करण्यात आली श्री बळीराम महाराज वाघे धुप्पेकर नांदेड जिल्हा अध्यक्ष,वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य
हारी महाराज वाघे धानोरकर नायगांव तालुकाध्यक्ष,वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी हजारो समाज बांधव व वाघ्या मुरळी परिषदेच्या संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment