मनसे शहराध्यक्ष रईस पठाण यांनी पत्रकारांचा मास्क व ऑक्सीमिटर मशिन देऊन केला गौरव. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

मनसे शहराध्यक्ष रईस पठाण यांनी पत्रकारांचा मास्क व ऑक्सीमिटर मशिन देऊन केला गौरव.

मनसे शहराध्यक्ष रईस पठाण यांनी पत्रकारांचा मास्क व ऑक्सीमिटर मशिन देऊन केला गौरव.  

       उमरी प्रतीनीधी-शेख आरीफ

उमरी :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनसे शहराध्यक्ष रईस पठाण यांनी उमरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना मास्क व ऑक्सीमिटर मशिन देऊन पत्रकारांचा आदर सत्कार केला आहे मनसे शहराध्यक्ष रईस पठाण आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की आपण सर्व पत्रकार बांधवांनी कोरोणा काळात अहोरात्र मेहनत घेवून वार्ताकंन केलात याची मला जाणीव आहे.म्हणूनच आपण खरे कोरोणा वारियर्स आहात
त्यानिमित्त मी आपल्या कार्याला सलाम करतो खरंच पत्रकार बांधवांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळात वार्तांकन करत होते अशा सर्व पत्रकार बांधवांचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले आणि एक छोटीशी भेट म्हणून मी आपणास मास्क ऑक्सीमिटर मशिन देत आहे आपण यापुढेही आपल्या लेखनीतून गोरगरीब दीन दुबळ्या लोकांना न्याय मिळविण्याचे काम करत रहावे अशी आशा व्यक्त करुन दाखवली.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष पांडुरंग कोल्हेवाड, उपाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, शहराध्यक्ष रईस पठाण, विठ्ठल कानगुले निमटेककर, महिला तालुका अध्यक्ष सुनिता चारण, दत्ता भुते, माधव जिगळेकर, संतोष जिगळेकर, जग्गनाथ,व सर्व पत्रकार बांधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment