एक लाखाची लाच घेताना तालुका हवालदाराला शहर हद्दीत एसीबी ने पकडले बारामती :- बारामतीतील लाचखोर पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात! एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले या बाबत माहिती अशी की, मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता मदत करण्यासाठी म्हणून दादासाहेब ठोंबरे याने१ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तड़जोड़ीअंती १लाख १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले आहे.चक्क बारामतीतील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडले यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आधी देखील अशी कारवाई झाली होती,आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना
लाच पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकड़ले आहे.लाचेच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत बारामती मध्ये उलट सुलट चर्चा चालू झाल्या असून काही पोलिसामुळे नाहक पोलीस खात्याची बदनामी होत आहे, यासाठी पोलिसांनी देखील शहानिशा करूनच कारवाई करावी विनाकारण पैसे घेऊन गुन्हे दाखल करून त्रास देण्याचं काम होऊ नये अश्या भावना व्यक्त होताना दिसतात.
No comments:
Post a Comment