अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष गालिंदे यांची निवड..
बारामती : अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बारामतीचे माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संजय घोलप आणि सरचिटणीस सुजित धनगर यांनी संतोष गालिंदे यांना निवडीचे पत्र दिले. गालिंदे यांनी नगरसेवक पदावर काम करीत असताना केलेली सामाजिक कामे, संघटन कौशल्य आणि समाजकार्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गालिंदे यांनी गेल्या महिनाभरातच खाटीक समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यांची भेट घेऊन विविध प्रश्न मांडले होते. त्यामध्ये प्रामुख्याने खाटिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, समाजातील होतकरू तरुणांना व्यावसायिक शिक्षण देणे यासह विविध मागण्यांवर धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गालिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment