*आयटीआयचे शिल्पनिदेशक आणि भोकर तहसीलचा लिपीक लाचेच्या जाळ्यात*
नांदेड प्रतिनिधी - शेख आरीफ
नांदेड:दि.17 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा 1 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आयटीआय येथील शिल्पनिदेशकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभगाने भोकर येथील लिपीकासह जेरबंद केले आहे.
दि.6 ऑगस्ट रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की,औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) येथील लोकसेवक संतराम घोळक त्यांना एक हजार रुपयांची लाच मागत आहेत. कारण सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रकरणातील तक्रारदाराने एक महिनाभर ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण शासकीय कर्मचारी व खाजगी लोकांना दिले होते.त्या अनुषंगाने भोकर तहसील कार्यालयातून त्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.दि.7 ऑगस्ट रोजी या लाच मागणीची पडताळणी करण्यात आली त्यात सुध्दा एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे सिध्द झाले.
17 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा एवले चहा या दुकानाच्या परिसरात शिल्पनिदेशक संतराम घोळक यांच्यावतीने एक हजार रुपयांची लाच स्विकारली.तसेच भोकर तहसील कार्यालयातील लिपीक लक्ष्मण पांचाळ यांनी लाच देण्यासाठी प्रोत्साहन देवून लाचेची रक्कम जमा करण्यास सांगितले होते.या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आयटीआयमधील शिल्पनिदेशक संतराम वैजनाथ घोळक (50) रा.मगनपूरा नांदेड आणि लक्ष्मण विठ्ठलराव पांचाळ (36) भोकर तहसील कार्यालयातील लिपीक या दोघांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर,अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर,जगनाथ अंतवार,ईश्र्वर जाधव,राजेश मुंडे,गजानन राऊत यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी,शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ,व्हिडीओ असेल,
एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment