कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर दत्तनगर चौक भुयारी मार्गासाठी निधी द्या..खा. सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर दत्तनगर चौक भुयारी मार्गासाठी निधी द्या..खा. सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर दत्तनगर चौक भुयारी मार्गासाठी निधी द्या..खा. सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र
पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) - कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान  दत्तनगर चौक येथील राजमाता भुयारी मार्ग उंच करणे, रुंदी वाढवणे आणि आणखी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे २३ कोटी रुपये इतक्या निधीची मागणी केली आहे. 
 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत सुळे यांनी पत्र पाठविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून २३ कोटी इतक्या निधीची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार प्राधान्य क्रमवार निधी मंजूर करून लवकरात लवकर येथील काम सुरू करावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. 
बाह्यावळण महामार्गावर दत्तनगर चौकात असलेला भुयारी मार्ग हा वाहतुकीचा प्रचंड ताण असलेला मार्ग आहे. तथापि या मार्गाची उंची आणि रुंदीही कमी नसल्याने सातत्याने याठिकाणी वाहनांची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी उंची आणि रुंदी वाढविण्याची गरज आहे. याशिवाय या एकाच भुयारी मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण येतो. त्यामुळे या भुयारी मार्गाला पर्याय ठरतील अशा आणखी दोन भुयारी मार्गाची आवश्यकता आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला असून यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.  या परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची सोय तसेच सुरक्षितता यांचा विचार करता लवकरात लवकर निधीची तरतूद करून काम पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे.

No comments:

Post a Comment