विकासकामांच्या बारामतीत लाचखोरीचे वाढले प्रमाण...कर्मचाऱ्याकडून लाच मागणार्या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल
बारामती:- बारामती मध्ये सद्दा चाललंय काय हा प्रश्न काहींना काही घडत असलेल्या घटनेवरून चर्चेत येत आहे, नुकताच लाच घेतल्या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असतानाच आत्ता बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये लाच मगितल्याचा गुन्हा दाखल दाखल होतोय याला म्हणावं काय, एखाद्या
नागरिकाचे काम करुन देण्यासाठी लाच घेतली
जाते.पण आपल्याच कार्यालयातील कर्मचार्याचे काम करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामती येथे कारवाई करुन एका जलसंपदा विभागातील एका उपविभागीय अभियंत्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय अभियंता संजय नारायण मेटे
(भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पलसदेव, ता.इंदापूर) आणि पोपट दशरथ शिंदे (रा. बारामती)अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे भीमा उपसा सिचंन प्रकल्पाच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे मेडिकल बील
मंजुरीसाठी उपविभागीय अभियंता संजय मेटे यांच्याकडे आले होते. बील मंजूर करण्यासाठी त्यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याला खासगी व्यक्ती पोपट शिंदे याने प्रोत्साहन दिले.तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधकविभागाने पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने
रविवारी सापळा लावण्यात आला होता. मात्र,आरोपींना संशय आल्याने ते लाच
स्वीकारण्यासाठी आलेच नाहीत. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने दोघांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या बारामती मध्ये करोडो रुपये विकासकामांसाठी आणून विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात तर दुसरीकडे काही अधिकारी व कारभारी मात्र जनतेकडून लाखो रुपये लुटण्याचा प्रकार करीत आहे याबाबत लवकरच पोलखोल होईलच पण उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे तर बारामती मधील भ्रष्टाचार थांबेल.व जनतेच्या प्रश्नाकडे हे अधिकारी लक्ष देतील.
No comments:
Post a Comment