*इंदापुरात कोविड योध्याचा सन्मान !*
बारामती - (अशोक कांबळे) पंचाहत्तराव्या स्वतंत्रदिनाचे औचित्य साधत लोकशाही उत्सव समिती इंदापूर तसेच इंदापूर पत्रकार आणि राष्ट्र सेवादल इंदापूर तालुका यांच्या वतीने आयोजित कोविड योद्धा पुरस्कार वितरण सभारंभ सोहळा रवीवारी (ता. १५) स्व. शंकरराव पाटील सभागृह कार्यालयात संपन्न झाला.
कोविड योध्याचा सन्मान सोहळा इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्राथमिक शिक्षक - शिक्षिका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी, वाहनचालक, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार अशा एकूण ३८ कोरोना योद्धाचा सत्कार सन्मानपत्र, शाल व श्रीफळ , गुलाबपुष्प, तसेच ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्र सेवादल अध्यक्ष अरुण होळकर, इंदापूर लोकशाही उत्सव समितीचे समन्वयक महेश स्वामी, नावराष्ट्रचे प्रतिनिधी शैलेश काटे, तसेच सर्वश्री विजय शिंदे, सिद्धार्थ मखरे, जितेंद्र जाधव, सलीम शेख, देविदास राखुंडे, संदीपान कडवळे, शिवाजी मखरे, प्रशांत शिताप इत्यादींनी अत्यंत नियोजनबद्दपणे केले.
No comments:
Post a Comment