राष्ट्रवादी काँग्रेस भवन बारामती याठिकाणी राबविला लोकाभिमुख अभिनव उपक्रम
बारामती:- बारामती तालुका व शहरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार बारामतीतील नागरिकांच्या स्थानिक अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी हा लोकाभिमुख अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
गुरुवार ता.२० ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झालेल्या उपक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील व एकात्मिक समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती येथे उपस्थित राहुन अनेक लोकांच्या अडीअडचणी व समस्या तालुकास्तरावर तत्काळ सोडवल्या व काही निवारणासाठी आश्वात केल्या.
दर गुरुवारी होणाऱ्या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून अनेक नागरिक आपापल्या समस्या व अडचणी मांडत आहेत. तसेच यापुढे हा उपक्रम दर आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० यावेळेत राबविला जाणार असून या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील,एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर,शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे,सभापती निता फरांदे,विविध संस्थांचे पदाधिकारी व शासकीय कमिटीचे अध्यक्ष,सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य,मदत व मार्गदर्शन करणार आहेत.तरी तालुका व शहरातील नागरिकांनी संपर्क साधावा.
सदरचा उपक्रम हा दर आठवड्याचा सोमवार व गुरुवार या दोन्ही दिवशी चालू राहणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी दिली.
No comments:
Post a Comment